Home »News» Hritik Roshan Birthday Celebration With Fans

हृतिक रोशनने फॅन्ससोबत सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, कापले 3 केक कापत, लोकांनी केला जल्लोष

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 18:01 PM IST

मुंबई - हृतिक रोशनने आज वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1974 साली जन्मलेल्या हृतिकने चाईल्ड अॅक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बुधवारी मुंबई येथील घरी हृतिकने त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी सकाळपासूनच हृतिकच्या घरी फॅन्सची गर्दी जमली होती. काही फॅन्स हृतिकची एक झलक पाहण्यासाठी बाउंड्रीवॉल पार करुन आले. फॅन्ससोबत हृतिकने कापला बर्थ डे केक...

हृतिकने त्याच्या घराबाहेरच त्याच्या फॅन्ससोबत केक कापले. यावेळी हृतिकच्या वाढदिवसाची इतकी क्रेझ होती की सर्वजण हृतिक हृतिक जोरजोरात ओरडत होते. बरेच फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नातही होते. यादरम्यान एक फॅन्स हृतिकचे निक नेम असलेला डुग्गु नावाचा केक घेऊन पोहोचला होता. यावेळी हृतिकची फॅमिली अनुपस्थित होती.


पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक रोशनच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended