आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपला बांधून फिरवलेल्या फारुखला मिळाली होती 'बीग बॉस'ची ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये 'ह्यूमन शील्ड' बनवलेल्या फारुख अहमद डारला रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या सीजन 11 मध्ये कंटेस्टेंट बनण्याची ऑफर मिळाली होती. एका वेब पोर्टलला डार याने सांगितल्याप्रमाणे दावा केला आहे की, या बदल्यात बिग बॉसच्या प्रोड्यूसरने डारला 50 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. रिपोर्टनुसार डारने मेकर्सची ही ऑफर फेटाळली होती. मुलाखतीत डारने सांगितले की, मेकर्सने माझे तिकिट बुक केले होते.


का फेटाळली बिग बॉसची ऑफर...
रिपोर्टनुसार, जीपमध्ये डारला अमानवीय पध्दतीने बांधण्यात आले होते. यानंतर ह्यूमन राइड्स कमीशनने जम्मू कश्मीर सरकारला भरपाई म्हणून त्याला 10 लाख रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. याच कारणांमुळे डारने शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. परंतू नंतर राज्य सकराकने पैसा देण्यास नकार दिला होता.

 

डार म्हणाला - मी माझ्या घरातूनच निघू शकत नाही तर कुठू बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला प्रत्येक ठिकाणी भिती वाटते. मला सन्मानाने आयुष्य घालवायचे आहे. या प्रकरणी 'बिग बॉस' च्या प्रोड्यूसर्सची काहीच रिअॅक्शन आली नाही. बिग बॉस सीजन 11 मध्ये शिल्पा शिंदे विजेती ठरली होती. 

 

काय होते प्रकरण ?
श्रीनगरमध्ये 9 एप्रिलमध्ये पोटनिवडनुकीच्या काळात बीडवाहसोबतच अनेक विभागात वोटिंग बूथवर हिंसा झाली होती. यावेळी मेजर लीतुल गोगोईने दगडफेक करणा-या लोकांची गर्दी कमी करण्यासाठी फारुखला ह्यूमन शील्डप्रमाणे वापरले होते. आणि जीपला बांधून पुर्ण शहरात फिरवले होते. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...