आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iifa Award 2018 Begins In Bangkok See Photos How Bollywood Stars Arrived In Green Carpet

IIFA 2018: बँकॉकमध्ये सुरु झाला इव्हेंट, ग्रीन कार्पेटवर उतरले बॉलिवूड कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी(IIFA)चे 19 वे एडिशन शुक्रवारी बँकॉकमध्ये सुरु झाले. तीन दिवस हा इव्हेंट सुरु असणार आहे. शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवशी अभिनेत्री नुसरत भरुचा आणि मौनी रॉयने डान्स परफॉर्मेंस दिला. तर म्यूझिक डायरेक्टर प्रीतमने लाइव्ह ऑर्केस्ट्रा परफॉर्म केला. आयफामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच मोठे स्टार बँकॉकमध्ये पोहोचले आहेत.


1. 20 वर्षांनंतर रेखा यांचा परफॉर्मेंस : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या यावेळी आयफा अवॉर्ड्समध्ये स्टेज परफॉर्मेंस देणार आहेत. त्यांनी 20 वर्षांपुर्वी 31 जानेवारी 1998 मधील 43 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये शेवटचा स्टेज परफॉर्मेंस दिला होता. त्यावेळी त्यांनी 'ये क्या शहर है दोस्तों', 'इन आंखों की मस्ती', 'सलाम-ए-इश्क' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गाण्यांवर डान्स केला होता.


2.  'प्लास्टिक बॅन' ही यावेळची थीम : संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरण दिवसाला 'बीट प्लास्टिक पोल्यूशन' कँपेन सुरु करण्यात आले. यानुसार आयफाची हीच थीम ठेवण्यात आली आहे. यूएनच्या गुडविल एंबेसेडर दिया मिर्जादेखील या इव्हेंटमध्ये हा संदेश घेऊन पोहोचणार आहेत.


3. 7 वर्षांनंतर बॉबी देओल करणार परफॉर्म : नुकताच 'रेस 3' मध्ये दिसलेला बॉबी देओल आयफा अवॉर्ड्समध्ये 7 वर्षानंतर परफॉर्म करणार आहे. पहिल्या दिवशी बॉबी देओल खुप सिंपल लूकमध्ये दिसला. त्याच्यासोबतच करण जोहर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, दिया मिर्जा, साहिल संगा, कोंकणा सेन शर्मा, कृती सेनन, यूलिया, डायना पेंटी, वरुण धवन, श्रध्दा कपूरसोबतच अनेक मोठे स्टार ग्रीन कार्पेटवर दिसले. 

 

पहिल्या दिवशी यांना मिळाले पुरस्कार

  कॅटेगिरी नाव
1. बॅकग्राउंड स्कोर जग्गा जासूस (प्रीतम चक्रवर्ती)
2. बेस्ट कोरियोग्राफी जग्गा जासूस (विजय गांगुली और रुएल दौसन वरिंदानी)
3. स्पेशल इफेक्ट जग्गा जासूस (एनवाय वीएफएक्स वाला)
4. बेस्ट स्क्रीनप्ले नितेश तिवारी आणि  श्रेयस जैन (बरेली की बर्फी)
5. बेस्ट डायलॉग हितेश केवल्य (शुभ मंगल सावधान)

 

दूस-यावेळी बँकॉकमध्ये : हा अवॉर्ड शो दूस-यांदा बँकॉकमध्ये होत आहे. यापुर्वी 2008 चा आयफा अवॉर्ड्स बँकॉकमध्ये झाला होता. त्यावर्षी शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया'ला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला होता. वृत्तांनुसार यावेळी अनुपम खेर यांना 'स्पेशल अवॉर्ड' दिला जाईल. तर आयफा अवॉर्ड 24 जून 2000 मध्ये लंडनमध्ये आयोजिक करण्यात आला होता. यामध्ये 'हम दिल दे चुके सनम'ला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या सोहळ्याचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...