आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराट आता या कारमध्ये फिरणार, टीम इंडियाच्या कॅप्टनकडे आहे 10Cr चे कार कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑडी R8 LMX - कारची किंमत साधारण  2.97 कोटी रुपये आहे. - Divya Marathi
ऑडी R8 LMX - कारची किंमत साधारण 2.97 कोटी रुपये आहे.

इटलीमध्ये ग्रँड वेडिंग आणि आता रोममध्ये हनिमूनला जाणारे अनुष्का-विराट हे कपल लक्झरी लाइफ जगते. त्यांच्या कलेक्शनमध्ये जवळपास 10 कोटींच्या कार आहेत. विराटची फेव्हरेट कार ऑडी आहे. तो या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडिर आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीकडे एकूण 6 कार आहेत. त्यातील 4 ऑडी आहे. इतर दोनमध्ये डस्टर आणि टोयोटा फॉर्च्यूनर यांचा समावेश आहे. 

 

गिफ्ट मिळाल्या या कार
- विराट भारतात टोयोटाचा ब्रँड अॅम्बेसेडिर आहे. कंपनीसोबत काम करत असल्यामुळे टोयोटाने त्याला फॉर्च्यूनर गिफ्ट केली आहे. 
- 2012 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना मॅन ऑफ द सीरीज अवॉर्ड जिंकल्याबद्दल त्याला डस्टर कार भेट मिळाली होती. 
- याशिवाय त्याच्या कलेक्शनमध्ये ऑडी S6, ऑडी Q7, ऑडी R8 LMX, ऑडी A8 L (W12 क्वार्टो), ऑडी आरएस 6  या कार देखील आहे. 
- विराटकडे ऑडी R8 देखील होती, मात्र त्याने ती विकून ऑडीची लिमिटेड एडिशन ऑडी R8 LMX लक्झरी कार खरेदी केली आहे. 

विराट अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले. त्यांनी लग्न सोहळा अतिशय खासगी ठेवला होता. वेडिंगमध्ये अवघे 50 लोक सहभागी होते. मेंदी ते साखरपुडा आणि लग्नापर्यंचे सर्व विधी हे इटलीतील बोर्गो फिनेशिटो या रिसॉर्टवर झाले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा विराटचे कार कलेक्शन... 

बातम्या आणखी आहेत...