आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22nd Death Anni: \'आपके पांव देखे.. बहुत हसीन है..\' हे आहेत राजकुमार यांचे फेमस डायलॉग्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार यांची आज 22 वी पुण्यतिथी आहे. 3 जुलै 1996 रोजी गळ्याच्या कॅन्सरमुळे मुंबईत त्यांचे निधन झाले होते. आज ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांची अॅक्टिंग स्टाइल, त्यांचे पांढ-या रंगाचे बूट आणि डायलॉग आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. 8 ऑक्टोबर 1926 रोजी पाकिस्तानच्या लोरालोईमध्ये येथे त्यांचा जन्म झाला होता. 1965साली रिलीज झालेल्या दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या 'वक्त' सिनेमातील 'चिनॉय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते...' हा राजकुमार यांचा डायलॉग आजही प्रसिध्द आहे. कमाल अमरोही यांचा 'पाकिजा' हा सिनेमा मीना कुमारी यांच्यावर केंद्रित होता, मात्र तरीदेखील राजकुमार आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरले. 'पाकिजा'मधील त्यांचा, 'आपके पांव देखे...बहुत हसीन हैं, इन्हें जमीन पर मत उतारिएगा... मैले हो जाएंगे...' हा डायलॉग एवढा लोकप्रिय झाला, की तो आजही सिनेरसिकांच्या ओठांवर रेंगाळत असतो.


हमराज (1967), हीर रंझा (1971), पाकीजा (1972), तिरंगा (1992) सह अनेक सुपरहिट सिनेमांत काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे राजकुमार आज जरी या जगात नसले, तरी कलाकृतींच्या माध्यमातून ते आपल्यातच राहतील. 


पुढील स्लाईड्सवर वाचा राजकुमार यांचे निवडक सुपरहिट डायलॉग्स... 

 

बातम्या आणखी आहेत...