आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतसृष्टी बंद पडली तर ड्रायव्हर होणार होते ए.आर. रहमान, वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु आहे प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए. आर. रहेमान म्हणजेच अल्लाह रक्खा रहमान यांचे वडील मल्याळी चित्रपटांचे संगीतकार होते. तामिळनाडूमधील सांगीतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात सहा जानेवारी १९६७ रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला. ते मूळचे हिंदू असून त्यांचं नाव ए. एस. दिलीपकुमार असं होतं. मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं ए. आर. रहेमान असं नाव ठेवलं. त्यांनी कमी वयातच संगीत क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 

 

1991 मध्ये यांनी स्वत: म्युझिक रेकॉर्डिगला सुरुवात केली. 1992 मध्ये चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम् यांच्या रोजा चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. या पहिल्याच चित्रपटासाठी रेहमान यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अत्यंत प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत.

 

जगातल्या सर्वोत्तम दहा संगीतकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. 'रोज', 'बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'लगान', 'रंग दे बसंती', 'स्वदेस', 'जोधा अकबर' हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. हिंदी, तमिळप्रमाणेच 'स्लमडॉग मिल्येनर', 'वॉरियर्स ऑफ हेवन अँड अर्थ', 'एलिझाबेथ' या हॉलिवुडच्या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. 'वंदे मातरम्' आणि 'जन गण मन' हे त्यांचे दोन प्रसिद्ध आल्बम. याशिवाय त्यांनी कित्येक जाहिरातींची जिंगल्स लिहून त्यांना संगीत दिलं आहे. 

 

अनेक गाण्यांना संगीत देणा-या ए. आर. रहेमान यांच्या आयुष्यातही अनेक संकट आली. या संकटांना सामोरे जाऊन त्यांनी आपले स्थान मिळवले. वयाच्या 9 व्या वर्षी पितृ छत्र हरपल्यानंतर त्यांना करावा लागलेला संघर्ष त्यांच संगीतावरील प्रेम, देवावरील निस्सिम विश्वास या सर्वांविषयी त्यांनी स्वतः भास्कर ग्रुपसोबत बोलताना सांगितल्या...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा ए. आर. रहेमान यांच्या आयुष्याविषयी तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी त्यांच्याच शब्दात...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...