आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Baahubali 2ची वर्षपुर्ती, फिल्मचे 21 डायलॉग्स.. काही हसवतात, काही करतात इन्स्पायर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या चित्रपटाच्या रिलीजला आज  (28 एप्रिल)  एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 28 एप्रिल 2017 रोजी 'कटप्पाने बाहुबली का मारले?' या प्रश्नाचे उत्तर तमाम प्रेक्षकांना मिळाले होते.  या चित्रपटातील प्रत्येक संवाद हा दमदार होता. तेलुगु भाषेत तयार झालेला हा सिनेमा हिंदीत डब करण्यात आला होता. पण याचे संवाद ऐकताना हा एखादा दाक्षिणात्यपट असल्याचे मुळीच वाटले नव्हते. 


मनोज मुंतशिर यांनी लिहिले होते सिनेमातील संवाद...
- सिनेमातील हिंदी व्हर्जनचे संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले होते. तर तेलुगु सिनेमासाठी मदन कार्की, मल्याळमसाठी मंकोम्बू गोपालकृष्णन आमि तामिळसाठी  सी एच विजय कुमार यांनी संवाद लेखन केले होते. 

 

सिनेमातील हे आहेत मुख्य पात्र...  

 

पात्र : अमरेंद्र/महेंद्र बाहुबली
अॅक्टर :प्रभास

- प्रभास तेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार आहे. हिंदी प्रेक्षकांमध्ये तो 'बाहुबली : द बिगनिंग'(2015) या सिनेमामुळे लोकप्रिय झाला.
- यापूर्वी प्रभासने बॉलिवूडमध्ये अजय देवगण स्टारर 'अॅक्शन जॅक्सन'(2014) या सिनेमातील एका गाण्यात कॅमिओ केला होता.

 

पात्र : भल्लालदेव
अॅक्टर : राणा दग्गुबती

- तेलुगु फिल्म 'लीडर'(2010) द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणा-या राणाने 'बाहुबली'पूर्वी बॉलिवूडमध्ये 'दम मारो दम'(2011), 'डिपार्टमेंट'(2011), 'ये जवानी है दीवानी'(2013) आणि 'बेबी'(2015) या सिनेमांत काम केलंय.

 

पात्र : देवसेना
अॅक्ट्रेस :अनुष्का शेट्टी

- अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 
-  दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनुष्काने 'रगडा'(2010), 'सिंघम'(2010), 'सिंघम2'(2013) आणि 'रुद्रमादेवी'(2015) या सिनेमांमध्ये काम केले.

 

पात्र : कटप्पा
अॅक्टर : सत्यराज

- सत्यराज तेलुगु सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी तामिळ, मल्याळम आणि कन्नडसह अनेक भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले. 
- 'बाहुबली'पूर्वी शाहरुख खान स्टारर बॉलिवूड फिल्म 'चेन्नई एक्स्प्रेस' (2013)मध्ये त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 

 

पात्र : बिज्जलदेव
अॅक्टर : नासर

- तेलुगु सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. 
- अक्षय कुमार स्टारर 'राऊडी राठोड'(2012) या सिनेमात त्यांनी व्हिलन बापजीची भूमिका साकारली होती.

 

पात्र : शिवगामी
अॅक्ट्रेस : राम्या कृष्णन

- राम्याने 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. यामध्ये 10 बॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे.
- बॉलिवूडमध्ये 'दयावान'(1988), 'परंपरा' (1993), 'शपथ' (1997), 'बडे मियां छोटे मियां' (1998) आणि 'वजूद'(1998) या सिनेमांमध्ये राम्याने काम केलंय. 


या चित्रपटाच्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक नजर टाकुया, चित्रपटातील गाजलेल्या संवांदांवर... 

बातम्या आणखी आहेत...