आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office Collection Akshay Kumar Film Padman Earns Rs 10.26 Crore In First Day

पहिल्या दिवशी 'पॅडमॅन'ने केली 10.26 कोटींची कमाई, असे आहे या 10 चित्रपटांचे फर्स्ट डे कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पॅडमॅन' हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांनी चित्रपट आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. आर. बाल्कींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 110.26 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन पॅडमॅनची सुरुवात चांगली झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट केले, "#PadMan has a DECENT start... Fri ₹ 10.26 cr... The biz, expectedly, picked up towards evening/night shows... The journey ahead is crucial... Sat + Sun should witness strong growth for a good weekend total..." 
शनिवार आणि रविवार विकेण्ड आल्याने चित्रपटाच्या कमाईत निश्चित वाढ होईल. खरं तर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलीज झालेल्या अक्षयच्या जॉली एलएलबी 2 या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा पॅडमॅनच्या तुलनेत अधिक होता. जॉली एलएलबी 2ची पहिल्या दिवसाची कमाई 12 कोटी इतकी होती.  


100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेणारा अक्षयचा सलग सहावा चित्रपट... 
- 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेणारा  पॅडमॅन अक्षय कुमारचा सलग सहावा चित्रपट ठरेल.   
- यापूर्वी त्याचे एअरलिफ्ट, हाउसफुल 3, रुस्तम, जॉली एलएलबी 2 आणि टॉयलेट एक प्रेमकथा हे चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...