आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटींहून अधिक लोकांनी पाहिला 'हेट स्टोरी 4'चा ट्रेलर, असे आहेत डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः उर्वशी रौतेला, करण वाही, विवान भटेना आणि इहाना ढिल्लन स्टारर 'हेट स्टोरी 4' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. ट्रेलरला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लोकांनी हा ट्रेलर बघितला आहे. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे अभिनेत्री उर्वशी रौतेला. तिचे अनेक बोल्ड सीन्स ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहेत. याशिवाय ट्रेलरमधील डायलॉग्ससुद्धा लक्षवेधी ठरत आहेत.

 

मिलाप जावेरींनी लिहिले डायलॉग्स...  
- चित्रपटातील डायलॉग्स प्रसिद्ध फिल्ममेकर आणि रायटर मिलाप जावेरींनी लिहिले आहेत.
- यापूर्वी त्यांनी कांटे, शूटआउट अॅट वडाला, एक विलेन आणि ग्रेट ग्रेंड मस्ती या चित्रपटांचे डायलॉग्स लिहिले आहेत. 

 

9 मार्च रोजी रिलीज होणार चित्रपट... 
- 'हेट स्टोरी 4' हा चित्रपट विशाल पंड्या यांनी दिग्दर्शित केला असून भूषण कुमार आणि कृष्ण कुमार याचे निर्माते आहेत. टी-सीरीज बॅनरमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
- येत्या 9 मार्च रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 

 

फिल्ममध्ये उर्वशी रौतेलाचा हॉट अवतार...

- 2013 मध्ये सनी देओल स्टारर 'सिंह साहब दि ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी उर्वशी रौतेला 'हेट स्टोरी 4'ची लीड अॅक्ट्रेस आहे.
- चित्रपटात उर्वशीचा हॉट आणि बोल्ड लूक लक्ष वेधून घेणारा आहे. या चित्रपटात ती दोन भावांसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
- उर्वशी या फिल्ममध्ये दोन्ही भावांच्या भांडणाचे कारण ठरेल. 

 

'हेट स्टोरी' सीरीजचा चौथा चित्रपट..
- 'हेट स्टोरी' सीरीजचा हा चौथा चित्रपट आहे. विशाल पंड्या यांनी या चित्रपटाच्या दुस-या आणि तिस-या भागाचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी या सीरीजच्या चौथ्या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
- चित्रपटाचा पहिला भाग विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातून बंगाली अभिनेत्री पाउली दाम हिने सेक्स सीनमधून चर्चा एकवटली होती.


पुढील स्लाईड्सवर वाचा, चित्रपटातील निवडक डायलॉग्स... 

बातम्या आणखी आहेत...