आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने मोडला स्वतःच्याच चित्रपटाचा रेकॉर्ड, 'पद्मावत' बनला हायएस्ट ग्रोसर मूव्ही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोणचा वादग्रस्त चित्रपट 'पद्मावत' एकानंतर एक रेकॉर्ड मोडत आहे. रिलीजच्या 14 दिवसांनंतरच 'पद्मावत' ने दीपिकाच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. चेन्नई एक्सप्रेसने डोमेस्टिक मार्केटमध्ये 226 कोटी(लाइफटाइम कलेक्शन) कमाई केली होती. तर पद्मावतने 231 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट लवकरच 250 कोटींचा आकडा पार करणार आहे. 

 

दहावा ऑल टाइम हायएस्ट ग्रोसर बनला 'पद्मावत'
- पद्मावत सध्या 10th हायएस्ट ग्रोसर मूव्ही बनला आहे. यापुर्वी बाहुबली 2, दंगल, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, सुल्तान, धूम 3, क्रिश3 आणि किक याच्या पुढे आहेत.
- राजपूत करणी सेना आणि इतर संघटनांच्या विरोधामुळे चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. 
- 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. चार राज्यांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाचे सर्वात जास्त कमाई करणा-या चित्रपटांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...