आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017: बॉलिवूडचा Highest Opener ठरला 'टायगर जिंदा है', 33.7 कोटींची केली कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने 2017 मधील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33.75 कोटींची कमाई केली आहे. 

 

'बाहुबली : द कन्क्लूजन'चा रेकॉर्ड मोडित काढण्यात अपयशी...
- रिजनल आणि बॉलिवूड चित्रपटांच्या कलेक्शन (केवळ हिंदी बेल्टमध्ये) मध्ये 'टायगर...' हा चित्रपट 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढण्यात अपयशी ठरला आहे.  'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.7 कोटी रुपयांची कमाई केली. एवढी कमाई करुन हा चित्रपट हिंदी व्हर्जनमध्ये टॉपवर आहे. 

- जर बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर यावर्षभरात अजय देवगण स्टारर 'गोलमाल अगेन' हा चित्रपट 30 कोटींचे कलेक्शन करुन टॉपवर होता. पण आता सलमानच्या चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडित काढला आहे.  

 

2017 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई कोणकोणत्या चित्रपटांनी केली, हे जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...