आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इस इलाके मे नए आए हो बरखुरदार...' वाचा प्राण यांचे सुपरहिट 11 डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनयाचे सम्राट, उत्कृष्ट कलाकार, काळजाला भिडणारे संवाद आणि सिंहासारखा आवाज, अशी प्रतिमा असलेल्या कलाकारने अनेक दशके हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केले. भारदस्त आवाजाने थिएटर हलवून टाकणारे प्राण यांचा आज वाढदिवस आहे.  12 फेब्रुवारी 1920  रोजी त्यांचा जन्म झाला. आज प्राण या जगात नाहीत परंतु त्यांच्या अनेक आठवणी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये आहेत.  प्राण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी हिंदी सिनेमामधील शानदार अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. अर्थातच 12 जुलै 2013 रोजी प्राण यांनी वयाच्या 93व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

2000 मध्ये 'विलेन ऑफ द मिलेनिअम'चा किताब नावी करणारे प्राण आपल्या अभिनयासोबतच डॉयलॉग डिलिव्हरीसाठीसुध्दा ओळखले जात होते. आपल्या भारदस्त आवाजाने डायलॉगमध्ये प्राण ओतणारे खलनायक प्राण यांची सिनेसृष्टीत वेगळीच ओळख होती.


लोकांनी प्राणला पहिल्यांदा 'बडी बहन' सिनेमात नोटीस केले. प्राण यांची सिगारेट ओढण्याची स्टाइल दिग्दर्शकाला भावली होती. त्यांच्याविषयीची एक किस्सा प्रसिध्द आहे, की लोकांमध्ये त्यांची भिती अशाप्रकारे होती, की एकेकाळी कुणीच आपल्या मुलाचे नाव प्राण ठेवत नव्हते. प्राण यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्त चला एक नजर टाकूया त्यांच्या काही सुपरहिट्स डॉयलॉग्सवर...


सिनेमा:'जंजीर'
दिग्दर्शक: प्रकाश मेहरा
रिलीज डेट:11 मे 1973
डायलॉग: ''इस इलाके मे नए आए हो बरखुरदार, वर्ना यहा शेर खान को कौन नही जानता!''


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्राणचे काही सुपरहिट्स डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...