आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात देवाची मूर्ती ठेवत नव्हते शशी कपूर, गार्डने सांगितल्या RARE गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/सुलतानपूर - पद्मभूषण शशी कपूर यांचे नुकतेच मुंबईतील कोकोलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 79 वर्षांचे शशी कपूर बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. शशी कपूर यांचे गार्ड आणि ड्रायव्हर असलेले राम तिरथ मिश्रा यांनी DainikBhaskar.Com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये शशी साहेबांबद्दल अनेक इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर केल्या. (पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या शशी कपूर यांच्याबद्दल)

 

1978 पासून शशी कपूर यांच्यासोबत होते राम तिरथ मिश्रा 
- राम तिरथ मिश्रा हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटरवर असलेल्या मिश्राने गावात राहातात. राम तिरथ यांचे वडील ब्रिटीशांच्या काळात कोलकात्यात ड्रायव्हर होते. 
- 1978 मध्ये राम तिरथ यांना शशी कपूर यांच्याकडे गार्ड आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली होती. राम तिरथ यांनी सांगितले की 7 वर्षांपूर्वी (2010) ते गावी परत आले आहेत. 

 

असे होते शशी कपूर... 
- पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे चिरंजीव होते शशी कपूर. पृथ्वीराज यांना तीन मुले होती, राज, शम्मी आणि धाकटे शशी कपूर. 
- शशी कपूर यांची पत्नी जेनिफरचे 1984 मध्ये कँसरमुळे निधन झाले होते. त्यांना दोन मुलं करण, कुणाल आणि संजना ही मुलगी आहे. 
- शशी कपूर यांनी पृथ्वी थिएटरचे नाटक शकुंतलापासून करिअरला सुरुवात केली होती. त्यांची पहिली फिल्म 'आग' होती, ही फिल्म राज कपूर यांनीच तयार केली होती. 'आवारा'मध्ये शशी कपूर यांनी मोठे बंधू राज कपूर यांच्या बालपणाचा रोल केला होता. 
- फिल्ममध्ये त्यांची एंट्री यश चोप्रांच्या धर्मपूत्र मधून झाली. शशी कपूर यांनी 150 पेक्षा जास्त फिल्ममध्ये लीड रोल केला होता. 
- 1970 ते 1980 च्या दशकात शशी कपूर यांनी प्राण यांच्यासोबत 9 फिल्म  ('बिरादरी', 'चोरी मेरा काम', 'फांसी', 'शंकर दादा', 'चक्कर पे चक्कर', 'राहू केतु' आणि 'मान गए उस्ताद') केल्या होत्या.  
- तर, अमिताभ बच्चनसोबतची शशी कपूरची जोडी प्रसिद्ध होती. 1974 ते 1991 पर्यंत या जोडीने 12 फिल्ममध्ये एकत्र काम केले. ('रोटी, कपड़ा और मकान', 'दीवार', 'कभी-कभी', 'ईमान धरम', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'सुहाग', 'दो और दो पांच', 'शान', 'सिलसिला', 'नमक हलाल', आणि 'अकेला')

 

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या शशी कपूर यांच्याबद्दल

बातम्या आणखी आहेत...