आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्टेशन येण्याअगोदरच प्रवास संपवण्याची वेळ आली', कॅन्सरग्रस्त इरफानचे हृदयद्रावक पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता इरफान खान सध्या लंडनमध्ये न्‍यूरोएन्‍डोक्रिन कॅन्सरचा इलाज करत आहे. जगभरातील त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.  इरफान खान अधेमधे त्याचे स्टेटस अपडेट करत असतो. आता त्याने पुन्हा एकजा एक मोठे पत्र लिहीले आहे आणि ते त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. इलाजाची शक्यता फार कमी आहे आणि त्यामुळे आता सर्व देवावर सोडले आहे, असे त्याने पत्रात लिहीले आहे.

 

त्याने पत्रात लिहीले आहे की, "काही महिन्यांपूर्वी मला अचानक कळाले की मला न्‍यूरोएन्‍डोक्रिन कॅन्सर आहे. हा आजार एक रेअर फिजीकल कंडीशन आहे आणि त्यावर जास्त इलाज काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. या आजाराच्या उपचाराबद्दल काही शाश्वती नाही. मी माझ्या जीवनप्रवासात मग्न होतो. माझ्यासोबत माझ्या भविष्याची स्वप्ने होती. अचानक एक तिकीट कलेक्टर येतो आणि माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणतो, तुझे स्टेशन आले आहे प्लीज उतरुन जा. माझ्या काहीच लक्षात आले नाही कारण माझे स्टेशन आलेच नव्हते पण त्यावर मला उत्तर मिळाले, पुढच्या स्टॉपवर उतरावे लागेल. तुझे स्टेशन आले आहे."
 
"आजार झाल्याचे कळताच मी हॉस्पीटलमध्ये भरती झालो. खूप त्रास होत होता. इतका की कोणते औषध आणि प्रार्थनांनीही काम करणे बंद केले. मला त्यावेळी कळाले की मी अशा कोणत्याच गोष्टीचा हिस्सा नाही ज्याची काही शाश्वती आहे. मी माझ्या बाल्कनीतून डोकावतो तिथून मला लॉड्र्सचे स्‍टेडियम दिसते. तेव्हा जाणवते की आता संदीग्धता हीच माझी शाश्वती आहे. पहिल्यांदाच मला आजादी या शब्दाची व्याख्या कळाली. एका खास प्रकारच्या प्राप्तीचा अनुभव. मी आभारी आहे त्या सर्वच प्रार्थनांचा ज्यामुळे मी प्रत्येक झाडाच्या पानांमध्ये, फुलांमध्ये एक नवीन जग पाहत आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इरफान खानने या पत्रासोबत शेअर केलेले फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...