आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर, म्हणाला उपचारांसाठी परदेशी जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपल्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याची माहिती  अभिनेता इरफान खानने शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून  दिली. दुर्मिळ असलेल्या या आजाराच्या उपचारासाठी इरफान विदेशात गेला आहे. तथापि, आजाराचे स्वरूप स्पष्ट केलेे नाही. 


अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनाही हाच आजार होता. २००३ मध्ये त्यांच्या पँक्रियाजमध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झाले होते. ८ वर्षे या आजाराशी लढा देऊनही २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. ५१ वर्षीय इरफानने ५ मार्च रोजी ट्विट करत एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्या आजारावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. 
न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर काय? : दुर्मिळ आजार असून तो एंडोक्राइन हार्मोन बनवणाऱ्या पेशींत होतो. याचा ट्यूमर हा ट्यूमर फुफ्पुस, अपेंडिक्स, आतड्या किंवा शरीरातील कोणत्याही भागात तयार होतो व कर्करोगातही परावर्तित होऊ शकतो. एम्सच्या सर्जरी विभागाचे सहायक प्राध्यापक सुनील कुमार यांच्या मते, रेडिएशन, शस्त्रक्रिया आणि किमोथेरेपीद्वारे यावर उपचार शक्य आहे. डॉक्टरांनुसार या ट्यूमरचे पहिले व दुसरे स्तर सामान्य असते. तिसरे स्तर घातक असते. यात हा ट्यूमर कर्करोगाचे रूप घेतो.

 

काय म्हणाला इरफान...

इरफानने त्याच्या ट्वीटची सुरुवात लेखिका मार्गेट मिशेल यांच्या एका कोटने केली आहे. त्याने लिहिले,  'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही.' 

 

इरफान त्याच्या ट्वीटमध्ये पुढे लिहितो,  'अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला  उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा' असं इरफानने लिहिलं आहे.

 

पुढील स्लाईड्वर वाचा, इरफानचे ट्वीट आणि काय म्हणाली होती इरफानची पत्नी...

बातम्या आणखी आहेत...