आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Irrfan Khan Thanks Audience After Receiving Best Actor Award For Hindi Medium In IIFA

IIFA मध्ये बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड जिंकल्यानंतर इरफान खानची भावूक पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 24 जून रोजी बँकॉकमध्ये आयफा 2018 अवॉर्डचे वितरण झाले. यावेळी अभिनेता इरफान खानला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला. इरफानने मंगळवारी आपल्या ट्वीटर अकाउंटवर लिहिले की, आयफाला धन्यवाद आणि माझ्या सर्व ऑडियन्सचेही धन्यवाद, जे या प्रवासात माझ्यासोबत होते. इरफानला 'हिंदी मिडियम' चित्रपटासाठी हा अवॉर्ड मिळाला. यामध्ये त्याने आणि पाकिस्तानी अभिनेत्री कबा कमरने एका अशा कपलची भूमिका साकारली होती, ज्यांना शाळेत अॅडमिशन देण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात.


इरफानने या स्टार्सला सोडले मागे
या अवॉर्डसाठी जग्गा जासूससाठी रणबीर कपूर, मुक्ति भवनसाठी आदिल हुसैन, न्यूटनसाठी राजकुमार राव आणि टॉयलेट एक प्रेम कथासाठी अक्षय कुमारला नॉमिनेशन मिळाले होते. इरफआनने या सर्वांना मागे टाकत हा अवॉर्ड मिळवला.
काही दिवसांपुर्वीच इरफानने लिहिले होते लेटर 
इरफान गेल्या चार महिन्यांपासून लंडनमध्ये गंभीर आजार न्योरोइंडोक्राइन कँसरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपुर्वी इरफानने लंडनमधून एक लेटर लिहून आपली परिस्थीती सांगितली होती. इरफान (51)ने या भावनिक लेटरमध्ये लिहिले आहे की, आता त्याने परिणामांची चिंता न करता हत्यार फेकले आहेत. पुढच्या चार महिन्यात किंवा दोन वर्षा आयुष्य कुठे घेऊन जाईल माहिती नाही.
दोन चित्रपटांमध्ये दिसणार इरफान
मार्चमध्ये इरफानने आपल्या आजाराचा खुलासा केला होता. त्यानंतर त्याचा 'ब्लॅकमेल' चित्रपट रिलीज झाला होता. यानंतर इरफानचे कारवां आणि पजल चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहेत. आजारपणामुळे त्याचा विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटाची शूटिंग पुर्ण होऊ शकलेली नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आले होते. परंतू इरफान बरा होऊपर्यंत हा चित्रपट टाळण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...