आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: कँसरमुळे कमी झाले इरफान खानचे वजन, लंडनमधून आला पहिला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इरफान खान सध्या लंडनमध्ये आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो लंडनमध्ये गंभीर आजार न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरवर उपचार घेत आहेत. त्याने नुकताच आपल्या ट्विटर हँडलवर प्रोफाइल चेंज केला आहे. उपचारादरम्यानचा त्याचा हा पहिला फोटो असल्याचे मानले जात आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये इरफान खुप सडपातळ दिसतोय. तरीही तो या फोटोमध्ये हसताना दिसतोय. परंतू त्याचे वजन आजारामुळे कमी झाले आहे असे दिसतेय. 

 

जूनमध्ये लेटर लिहिले होते की, मी आता हत्यार टाकले आहेत
- जूनमध्ये इरफान खानने एक लेटर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. इरफानने या लेटरमध्ये लिहिले होते की, की आता त्याने परिणामांची चिंता न करता हत्यार टाकले आहेत. पुढचे चार महिने किंवा दोन वर्षांनंतर हे आयुष्य कुठे घेऊन जाईल हे मला माहित नाही असेही त्याने लिहिले होते. 
- जूनच्या शेवटच्या आठवड्यात मीडिया रिपोर्ट्समध्ये चर्चा होती की, इरफान या वर्षाच्या शेवटी भारतात परतेल. इरफानच्या मित्राचा दाखला देऊन हे वृत्त असल्याचे सांगितले जात होते. हा मित्र इरफानला लंडनमधून भेटून आला आहे असेही बोलले जात होते. 


इरफानच्या अनुपस्थितीत रिलीज होणार त्याचा दूसरा चित्रपट
- जेव्हापासून इरफान लंडनमध्ये गेला आहे, तेव्हापासून त्याचा एक चित्रपट (ब्लॅकमेल) रिलीज झाला आहे. आता त्याचा दूसरा चित्रपट 'कारवा' हा रिलीजसाठी तयार आहे. हॉस्पिटलमध्ये जाण्यापुर्वी इरफान 'कारवां'वर काम करत होता. हा चित्रपट 3 ऑगस्टला रिलीज होणार आहे. यामध्ये इरफान, दुल्कीर आणि मिथिलासोबत कृती खरबंदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...