आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 60 दिवसांनंतर इरफान चाहत्यांच्या भेटीला, म्हणाला - 'दोन कारवाँ सुरु आहेत...'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान सध्या एक दुर्धर आजाराशी सामना करतोय. काही दिवसांपूर्वी त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्युमर या आजाराचे निदान झाले. या आजारावर सध्या इरफान लंडमध्ये उपचार घेतोय. 16 मार्च रोजी इरफानने ट्वीट करुन आपल्या आजारपणाची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता तब्बल दोन महिन्यानंतर इरफान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला आला असून त्याने त्याच्या आगामी 'कारवाँ' या चित्रपटाविषयी ट्वीट केले आहे


ट्वीटमध्ये काय  म्हणाला इरफान... 
‘कारवाँ’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने इरफानने एक फोटो पोस्ट केला असून काही सुरेख ओळी त्या फोटोसोबत लिहिल्या आहेत. ”कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीच्या वेळी असणारी निरागसता विकत घेता येत नाही…दलकर आणि मिथिला या ‘कारवाँ’शी जोडले गेले आहेत… त्याबद्दल त्यांचे आभार. सध्या दोन ‘कारवाँ’ सुरु आहेत, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे चित्रपट”, असं तो या पोस्टमधून म्हणाला आहे.


'कारवाँ' हा चित्रपट दिग्दर्शक आकर्ष खुराणा यांनी दिग्दर्शित केला असून इरफानसह या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर आणि मल्याळम सुपरस्टार दलकर सलमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. यावर्षी 10 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


16 मार्च रोजी इरफानने ट्वीटरवर काय लिहिले होते?
इरफानने त्याच्या ट्वीटची सुरुवात लेखिका मार्गेट मिशेल यांच्या एका कोटने केली होती. त्याने लिहिले होते, 'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही.' इरफानने त्याच्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले होते, "अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा."


काय असतो न्यूरो एन्डोक्राइन ट्यूमर?
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनाही हाच आजार होता. 2003 मध्ये त्यांच्या पँक्रियाजमध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झाले होते. 8 वर्षे या आजाराशी लढा दिल्यानंतर 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. 51 वर्षीय इरफानने 5 मार्च रोजी ट्विट करत एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्या आजारावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा एक दुर्मिळ आजार असून तो एंडोक्राइन हार्मोन बनवणाऱ्या पेशींत होतो. याचा ट्यूमर हा फुफ्पुस, अपेंडिक्स, आतड्या किंवा शरीरातील कोणत्याही भागात तयार होतो व कर्करोगातही परावर्तित होऊ शकतो. एम्सच्या सर्जरी विभागाचे सहायक प्राध्यापक सुनील कुमार यांच्या मते, रेडिएशन, शस्त्रक्रिया आणि किमोथेरेपीद्वारे यावर उपचार शक्य आहे. डॉक्टरांनुसार या ट्यूमरचे पहिले व दुसरे स्तर सामान्य असते. तिसरे स्तर घातक असते. यात हा ट्यूमर कर्करोगाचे रूप घेतो.


कोण आहे इरफान खान?
- 7 जानेवारी 1967 रोजी जयपूर येथे जन्मलेल्या इरफानने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याला प्रयोगशील भूमिकांसाठी ओळखले जाते.
- 1988 मध्ये मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' या चित्रपटातून इरफानने डेब्यू केले होते. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते.
- हासिल, मकबूल, लाइफ इन मेट्रो, न्यूयॉर्क, द नेमसेक, लाइफ ऑफ पई, साहब, बीवी और गँगस्टर 2 आणि पान सिंह तोमर हे इरफानचे गाजलेले चित्रपट आहेत.
- 2011 मध्ये इरफानने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- 2012 मध्ये इरफानला पान सिंह तोमरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इरफान आणि त्याची पत्नी सुतापा सिकंदर यांनी यापूर्वी केलेले काही ट्वीट्स... 

बातम्या आणखी आहेत...