आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन, केली होती परिणीतीच्या आईची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'इशकजादे' चित्रपटात परिणीती चोप्राच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत शूटिंग करण्यामुळे आलेल्या तणावामुळे त्यांचे निधन झाले. अनेकदा तर त्या रात्री 3 पर्यंत शूटिंग करत असत. त्यांची मुलगी आल्यानंतर सोमवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची बातमी आहे. परिणीतीनेही ट्वीट करुन व्यक्त केले दुःख..

 

परिणीतीने चारु रोहतगी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत टवीट केले की, इशकजादेमध्ये तुम्ही खूप प्रेमळ आईच्या भूमिकेत होता. तुमच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. मी कधीच तुम्हाला विसरु शकत नाही. 

 

चारु यांनी केले या चित्रपटांत काम...
चारुने 'इशकजादे' शिवाय '15 पार्क अवेन्यू', 'सेकंड मैरिज डॉट कॉम' '1920 लंदन' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्यांनी प्रतिज्ञा, उतरन, त्रिदेवियां यांसारख्या टीव्ही मालिकांतही काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चारु रोहतगीचे आणखी काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...