आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी चॅनच्या मुलीवर रस्त्यावर राहण्याची वेळ, वडील आहेत 867 संपत्तीचे मालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इंटरनॅशनल सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी सध्या गरीबीचा सामना करतेय. तिला घरातून काढून हाकलण्यात आलेय. तिच्या जवळ खाण्यासाठीही पैसे नाही. एटाने स्वतः यू-ट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करुन ही माहिती दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. एटानुसार तिच्या या परिस्थितीला तिचे पालक जबाबदार आहेत. एटा म्हणते की, तिचे पालक समलैंगिक नाते स्विकारत नाहीत. एटाने सांगितले की, ती फीमेल सेलिब्रिटी एंडी ऑटमसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 


लेस्बियन असल्यामुळे वडिलांनी घरातून हाकलले
- एटा 18 वर्षांची आहेत. तिने व्हिडिओमध्ये सांगितले की, ती लेस्बियन असल्यामुळे वडील जॅकी चॅनने तिला घरातून काढून दिले. ती आणि तिची गर्लफ्रेंड एंडीला सध्या हाँगकाँगमधील ब्रिज खाली राहावे लागत आहे. एटा एक्स-ब्यूटी एलायने एंजी आणि जॅकी चॅनची मुलगी आहे. स्वतः जॅकीही पब्लिकली आपल्या मुलीविषयी बोलला नाही. पण त्याने मान्य केले होते की, त्याचे अफेअर एलायनेसोबत होते. या दोघांनी लग्न केले नव्हते.


आईने मुलाचा दावा खोटा असल्याचे सांगितले
- हाँककाँगच्या एका वेबसाइटनुसार, स्वतः एलायने मुलीचा दावा खोटा असल्याचे सांगितलेय. ती म्हणाली की, एटाला स्वतःसाठी नोकरी शोधायची आहे.


867 कोटी संपत्तीचा मालक आहे जॅकी
- जॅकी चेन जवळपास 867 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तिचे लग्न जोआन लिनसोबत झाले. दोघांना जेसी चॅन हा मुलगा आहे. परंतू मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला आपल्या मुलालाही आपली संपत्ती द्यायची नाही. त्याचे म्हणणे आहे की, मुलाला प्रॉपर्टी देण्याऐवजी चॅरिटीला संपत्ती देईल. जॅकी मानतो की, मुलाला काम येते तर तो स्वतः कमाई करु शकते. जर येत नसेल तर तो फक्त पैशांची उधळपट्टी करेल. जॅकी नेहमीच चॅरिटीसाठी काम करत असतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...