आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Dhadak'मध्ये ईशानसाठी बनवण्यात आले एकसारखे अनेक शर्ट्स, चार लहेंग्यांचा केला वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: आज (20 जुलै, शुक्रवार) बॉक्सऑफिसवर 'धडक' चित्रपट दाखल होतोय. या चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर डेब्यू करतेय. तर तिच्यासोबतच शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या चित्रपटात आहे. चित्रपटाचे ट्रेलर आणि गाण्याला लोकांनी पसंदी दिली आहे. चित्रपटाची शूटिंग उदयपुर(राजस्थान)मध्ये झाली आहे. चित्रपटामध्ये ईशान खट्टरने एक रेड कलरचा शर्ट घातला आहे. या शर्टची विशेषता म्हणजे हे शर्ट चार लहेंग्यांनी तयार करण्यात आलेय. 


परफेक्ट शॉटसाठी बनवले शर्ट्स
- चित्रपटातील 'पहिली बार' या गाण्याच्या सीनसाठी ईशानला तलावात उडी मारावी लागते. या तालावात जान्हवी आपल्या मैत्रिणींसोबत पहिलेच असते. हा शॉर्ट परफेक्ट व्हावा यासाठी ईशानचा शर्ट प्रत्येकवेळी सुकलेला असणे गरजेचे होते. यामुळे मेकर्सने चार लहेंग्यांपासून एकसारखा शर्ट बनवला. हा शर्ट वरुन रेड आहे, तर खालून त्याला लहेंग्यामध्ये यूज होणारे गोटे लावलेले आहेत. 
- चित्रपटाचे डायरेक्शन शशांक खेतानने केले आहे. यापुर्वी शशांकने 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'इश्कजादे' सारखे सुपरहिट चित्रपट बनवले आहेत. तर प्रोड्यूसर करण जोहर आहेत. 

 

सारा माझ्यापेक्षा उत्कृष्ट
मीडियामध्ये सध्या जान्हवी कपूर आणि सारा अली खानमध्ये स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. याविषयी जान्हवी म्हणाली की, 'आमच्यामध्ये काहीच स्पर्धा नाही. मला सारा जास्त पुढे जाणार असे वाटते. मला वाटते की, महिलांनी एकमेकिंना सपोर्ट केला पाहिजे.' जान्हवीच्या अशा बोलण्याने इव्हेंटमधील सर्व उपस्थित इम्प्रेस झाले. 

बातम्या आणखी आहेत...