आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhadak:...म्हणून हिंदी 'झिंगाट' गाणे कोरिओग्राफ करण्यास फराह खानने दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट 'धडक'मधील 'झिंगाट' गाणे रिलीज झाले आहे. गाण्यामध्ये दोन्ही अॅक्टर्स फुल एर्नजीसोबत थिरकताना दिसत आहेत. त्यांना एवढी एनर्जी दाखवावीच लागेल. कारण 'झिंगाट' गाण्याच्या ओरिजनल व्हर्जनमध्ये यापेक्षा दुप्पट एनर्जीने डान्स केलेला आहे. 'धडक' हा चित्रपट मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे. सैराट 2016 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. फक्त 4 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 110 कोटींची कमाई करुन इतिहास रचला होता.

 

फराह खानने कोरिओग्राफ करण्यास दिला होता नकार
फराह खानला शशांक खैतान आणि करण जोहरने हिंदी झिंगाट गाण्याची कोरिओग्राफी करण्याची ऑफर दिली. परंतू फराहने नकार दिला. कारण फराहला वाटत होते की, मराठी झिंगाट गाणे हे पहिलेच खुप प्रसिध्द आहे. हे पुन्हा कोरिओग्राफ करणे योग्य होणार नाही. परंतू करणने सांगितल्यामुळे फराह तयार झाली. 

 

'झिंगाट' गाण्याचे मराठी आणि हिंदी कंपोजर एक 
सैराट चित्रपटाच्या यशात 'झिंगाट' गाण्याचा खुप मोठा वाटा होता. यामुळे हे गाणे हिंदी चित्रपटात घेणे महत्त्वाचे होते. या गाण्यामध्ये काहीच बदल करण्यात आले नाही. अजय-अतुल यांनी मराठी झिंगाट कम्पोज केले होते. त्यांनीच हिंदी गाणेही कंपोज केले. मराठी 'झिंगाट' ला अतुलने आपला आवाज दिला होता. हिंदी गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे.

 

सोशल मीडियावर करावा लागतोय टीकेचा सामना
27 जूनला झिंगाटचे हिंदी व्हर्जन रिलीज झाले. परंतू सोशल मीडिया यूजर्सला हे गाणे विशेष आवडले नाही. यूजर्सने या गाण्याची तुलना मराठी गाण्यासोबत केली. यामुळे खुप टिका झाले.
- एका यूजरने लिहिले की, 'मराठी झिंगाट माझ्या आवडच्या गाण्यांपैकी एक आहे, परंतू याचे हिंदी व्हर्जन खुप निकृष्ठ आहे.'

 

करण जौहरने खरेदी केले होते राइट्स
नागराज मंजुळे यांनी 'सैराट' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाच्या यशानंतर करण जौहरने याचे हिंदी राइट्स खरेदी केले होते. गेल्या वर्षी त्याने ईशान आणि जान्हवीसोबत हा चित्रपट करणार असल्याची घोषणा केली. त्याची प्रोडक्शन कंपनी धर्मा प्रोडक्शनने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. चित्रपटाची कथा 'सैराट' प्रमाणेच ठेवण्यात आली आहे. परंतू बॅकड्रॉप महाराष्ट्रीयनन ठेवता राजस्थानी ठेवला आहे. चित्रपटाची काही शूटिंग जोधपुर, जयपुरमध्ये झाली आणि काही मुंबईमध्ये झाली आहे. चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खैतान आहेत. त्यांनी आतापर्यंत 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'चे दिग्दर्शन केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...