आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय जान्हवीला आहे राखी पोर्णिमेची प्रतिक्षा, पहिल्यांदा बांधणार अर्जुनला राखी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला यावेळी राखी पोर्णिचेची प्रतिक्षा आहे. कारण 21 वर्षांची जान्हवी पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जुन कपूरला राखी बांधणार आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'धडक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान ती म्हणाली की, गेल्या काही महिन्यांपासून भैयाने आम्हाला जी हिम्मत आणि तागद दिली आहे ते आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आई गेल्यानंतर कठीण काळ आला, यामध्ये आमचे संपुर्ण कुटूंब एकत्र आले. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आपल्या सावत्र बहिणींची पुर्ण काळजी घेत आहे काही दिवसांपुर्वीच सोशल मीडिया यूजर्सने जान्हवीला कमी कपडे घातल्यामुळे ट्रोल केले होते तेव्हा अर्जुनने आपल्या बहिणीला सपोर्ट केला होता. यासोबतच या प्रकरणाला प्रोत्साहन दिल्यामुळे अर्जुन कपूरने मीडियावर नाजारी व्यक्त केली होती. 


- मुलाखतीत जान्हवी कुटूंबाविषयीही बोलली, "सध्या मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रवास जास्त होतोय. यामुळे खुशीसोबत खुप कमी वेळ घालवायला मिळतोय. यामुळे खुशीला खुप मिस करतेय. खुशी ही माझ्या 'धडक'मधली भूमिकेप्रमाणे मजबूत आणि इंडिपेंडेट आहे, मला तिची नेहमी गरज असते."


- खुशीविषयी जान्हवी म्हणाली की, 'मी खुशीपेक्षा मोठी आहे, परंतू ती मला सांभाळते. मी जेवण केले नाही तर ती मला फोन करुन ओरडते, मला झोप आली नाही तर मला येऊन झोपी घालते. का माहित नाही, पण खुशीमध्ये माझ्या आईला पाहते. खुशी माझा कम्फर्ट आणि सिक्युरिटी आहे.'


- जान्हवी 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. डायरेक्टर शशांक खेतानच्या या चित्रपटात जान्हवीसोबत ईशा खट्टर स्क्रीन शे्र करतोय. करण जोहर या चित्रपटाचे प्रोडक्शन करत आहेत. हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...