आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office Collection : जान्हवी-ईशानच्या \'धडक\'ने पहिल्या दिवशी कमावले 8.71 Cr

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर धडक हा चित्रपट 20 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8.71 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, 'नवोदितांच्या चित्रपट असलेल्या 'धडक'ला खूप चांगले ओपनिंग मिळाले आहे. यापूर्वी आलेल्या न्यूकमर्सच्या 'स्टूडंट ऑफ द ईयर' (2012) ने 8 कोटींहून अधिकचे कलेक्शन केले होते.' 'धडक' हा चित्रपट भारतात 2235 स्क्रीन आणि ओवरसीजमध्ये 556 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.

 

- एकंदरीत या चित्रपटाला 2791 स्क्रीन मिळाल्या आहेत. हा चित्रपट मराठीत 110 कोटींची कमाई करणा-या 'सैराट' या चित्रपटाचा रिमेक आहे.शंभर कोटींहून अधिकचा गल्ला जमवणारा सैराट हा पहिला मराठी चित्रपट आहे.

 

70 कोटींच्या बजेटमध्ये बनला 'धडक' :

- जान्हवी कपूरच्या 'धडक' या चित्रपटाचे बजेट 50 कोटींच्या घरात असून जाहिराती आणि मार्केटिंगवर 20 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच या चित्रपटाचे एकुण बजेट 70 कोटींच्या घरात आहे.
- 'धडक'साठी जान्हवीला 40-45 लाख रु. मानधन मिळाले. तर तिच्या तुलनेत ईशानला अधिक फिस देण्यात आली. या चित्रपटासाठी ईशानला 60-70 लाखांच्या घरात फिस मिळाल्याचे समजते. 

 

चित्रपटाची स्टोरी..
सैराट चित्रपटाचा रिमेक असल्याने गावातील सवर्ण आणि खालच्या जातीतील समिकरण यामध्ये मांडलेले आहे. पार्थवी ही उदयपूरच्या रतनसिंह या राजकारण्याची मुलगी, तर मधुकर बागला हा सामान्य व्यक्तीचा मुलगा. दोघे प्रेमात पडतात. मात्र, जातीय समिकरणे कट्टरपणे पाळल्या जात असलेल्या राजस्थानात मधूचे वडील त्याला सावध करतात. मात्र, जान्हवीचे प्रेम त्याला शांत बसू देत नाही. दोघांचे प्रेम पकडले जाते, अन् त्यांना गावातून पळून जाण्याची वेळ येते. नागपूर मार्गे कलकत्यात जोडपे येते. नवी संसार थाटतात. अन नंतरची कहाणी प्रेक्षागृहात जाऊन अनुभवायला हवी. 

 

बातम्या आणखी आहेत...