आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवीविना असा साजरा केला जान्हवीने 21वा वाढदिवस, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर 6 मार्च रोजी 21 वर्षांची झाली. श्रीदेवींच्या इच्छेप्रमाणे मुंबईतील एका वृद्धाश्रमात जान्हवीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केल्यानंतर घरीसुद्धा बर्थडे सेलिब्रेशन झाले. या सेलिब्रेशनमध्ये जान्हवीचे वडील बोनी कपूर, धाकटी बहीण खुशी, सावत्र बहीण अंशुला, चुलत बहिणी सोनम कपूर, रिया कपूर, सनाया कपूर आणि चुलत भाऊ जहान कपूर सहभागी झाले होते. 


24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन झाले होते. आईविनाचा जान्हवीचा हा पहिलाच वाढदिवस होता. श्रीदेवी यांनी जान्हवीच्या वाढदिवसाचे काही प्लॅन बनवले होते. त्यांनी याबद्दल बोनी कपूर यांना कल्पनाही देऊन ठेवली होती. श्रीदेवी यांच्या इच्छेप्रमाणेच बोनी कपूर यांनी  जान्हवीचा वाढदिवस साजरा केला. 


पुढील स्लाईड्सवर बघा, जान्हवी कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...