आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मुलीचे First मॅगझीन शूट, सिझलिंग लुकमध्ये झळकली जान्हवी कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी खास फोटोशूट केले आहे. जान्हवीचे हे पहिलेच फोटोशूट आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, आई श्रीदेवीच्या अचानक जाण्याच्या दुःखातून आम्ही कधी बाहेर पडू शकणार नाही पण यानंतर संपूर्ण फॅमिली एकत्र आली आणि आम्ही त्याकाळात एकमेकांना फार सपोर्ट केला. जान्हवीने सांगितले की, मला माझ्या आईवडिलांवर गर्व आहे. आई मला नेहमी सांगत असे की, तुम्हला कसा रोज मिळतो ते महत्त्वाचे नाही पण तुम्ही त्या रोलमध्ये कशी छाप सोडतात ते म्हत्त्वाचे आहे, हेच एका अभिनेत्याचे काम आहे. जान्हवी दिसली फारच गॉर्जिअस..

 

मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये जान्हवी फारच गॉर्जिअस दिसत आहे. शूटच्या सर्वच फोटोंमध्ये तिचा गॉर्जिअस लुक दिसत आहे. मॅगझीनच्या जून इश्यूवर जान्हवी कव्हर गर्ल बनली आहे. या शूटवेळी तिने फ्लोरल प्रिंटचे आऊटफिट घातले आहे. या फोटोत ती मोठ्या सोफ्यावर बसली आहे आणि तिने जीन्स आणि जॅकेट कॅरी केले आहे. या फोटोत तिने लाईट ग्रीन रंगाचा ड्रेस घातला आहे. मॅगझीनचे फोटोशूट प्रसाद नायक यांनी क्लिक केले आहे. मेकअप सुभाष लागल आणि स्टाईल प्रियांका कापडीयाने डिझाईन केले आहे. 

 

जान्हवी लवकरच आपल्याला धडक या चित्रपटातून भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर डेब्यू करत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवी कपूरचे काही खास फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...