आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Dhadak\' चित्रपटाच्या यशासाठी वडील आणि बहिणीसोबत तिरुपतीला पोहोचली जान्हवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर, वडील बोनी कपूर आणि लहान बहीण खुशीसोबत तिरुपतीच्या मंदित पोहोचली. तिथे तिघांनी तिरुपतीचे दर्शन केले आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ जान्हवीच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दर्शनाच्यावेळी जान्हवी-खुशी साडीमध्ये दिसल्या. जान्हवीने ब्लू-पिंक साडी नेसली होती तर खुशीने मरुन-ग्रीन साडी नेसली आहे. जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट 20 जुलैला रिलीज होत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्क्रीन शेअर करतोय. चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट'चा रीमेक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...