Home »News» Javed Akhtar Supports Statement Of Sonu Nigam

प्रार्थनास्थळावर लाऊडस्पीकर नकोच, जावेद अख्तर यांनी केले सोनू निगमचे समर्थन

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 12:24 PM IST

नवी दिल्ली - प्रसिद्ध गायक सोनू निगम काही दिवसांपूर्वी मशिदीवरील लाऊडस्पिकरबाबतचे वक्तव्य केल्याने चांगलाच वादात अडकला होता. ट्विटरवरील या वक्तव्यावरील वादानंतर त्याने ट्वीटरला रामरामही ठोकला होता. पण आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीदेखिल सोनू निगमच्या त्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. सोनू निगमच्या त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे मी रेकॉर्डवर सांगू इच्छितो असे ट्वीट करत जावेद अख्तर यांनी सोनू निगमला पाठिंबा दर्शवला.


जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही परखड उत्तर दिले आहे. एका यूझरला उत्तर देताना ते म्हणाले, मी प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उचलतो. पण अडचण ही आहे की, तुम्ही इतरांच्या चुका मान्य करू शकता पण स्वतःच्या नाही. दरम्यान सोनू निगमने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सध्या या वादामुळे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे, अशा वेळी अख्तर यांनी वक्तव्य केले. चित्रपट सृष्टीतील लोक पाठिशी उभे राहिले नसल्याची खंतही सोनू निगम यांनी बोलून दाखवली.

मुस्लीम योगा टिचरच्या विरोधात फतवा काढल्यानंतरही सोनू निगमने एक परखड वक्तव्य केले होते.. काय होते ते वाचा पुढील स्लाइड्सवर..

Next Article

Recommended