आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : लग्न, वाढदिवसाची पार्टी आणि एक मृत्यू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारवाह कुटुंबाची दिल्लीत एक चित्रपट प्रशिक्षण संस्था आहे. हादेखील त्यांचा एक व्यवसाय आहे. बोनी कपूरची बहीण मारवाह कुटुंबाची सून आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सौर मंडळात कुणास ठाऊक ग्रहांची दशा काय होती, त्यामुळे पृथ्वीवर इतक्या सुख आणि दु:खाचा योग आला. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये श्रीदेवी यांच्या शरीरात दारू आढळली. त्यामुळे मध्यवर्गीयांच्या नैतिकतेच्या दुहेरी मापदंडाच्या चादरीत िछद्र पडले आणि चादरीची चाळणी झाली. 

 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात ४२ टक्के महिला दारू पितात. श्रीमंत वर्ग आणि जनजातीमध्ये स्त्री-पुरुष सर्वच दारू पितात. ढाेंगी जीवन मूल्यांचे निर्वहन करण्याचा शाप फक्त मध्यमवर्गालाच आहे. जे काम श्रीमंत वर्ग आणि जनजाती उघडपणे करतात तेच काम ते पडद्याच्या आड बसून करतात. कुठे कुठे हे पडदे पोत्याचे असतात. पडद्याची निवड व्यक्तीची आर्थिक दशा आणि त्याच्या आवडीवर अवंलबून असते. बेपर्दा मजबुरी असू शकते. 

 

सआदत हसन मंटो यांच्या विषयी सांगायचे झाले तर, ते समाजाच्या जखमेत आपल्या पेनाने छिद्र करायचे आणि त्या वाहत्या पूने शाई म्हणून लिहायचे. मुंशी प्रेमचंद यांची कलम त्यांच्याच रक्तात बुडालेली असायची. काही लेखक बॉलपेनने लिहितात. 

 

श्रीदेवी दारू पित होत्या, पण दारु त्यांना पीत नव्हती. नाहीतर त्यांनी तीनशे चित्रपटात अभिनय केला नसता. आपल्या ५४ वर्षांच्या जीवनात त्यांनी कमीत कमी २५ वर्षे स्टुडिओ सेट्स आणि लोकेशनवर घालवले. बाथरूमच्या टबमध्ये बुडून जिम मॉरिसन यांचादेखील मृत्यू झाला होता. अमेरिकेची प्रसिद्ध पॉप गायिका व्हिटनी ह्यूस्टन यांचा मृत्यूदेखील बाथरूममध्ये झाला हाेता. खळबळ निर्माण करण्यासाठी समर्पित इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रीदेवी तणावात होत्या, असे सांगत आहे. खरं तर आपण सर्वच नेहमी तणावात जगतो. जीवनाची गिरणी खूपच बारीक दळते. श्रीदेवीला काही असामान्य तणाव नव्हता. अनेक कलावंत आपल्या प्रत्येक चित्रपट प्रदर्शनापूर्वी तणावात असतात. सर्वच निर्मिती प्रक्रियेत तणाव असतो. 

 

बाप-लेकाचे नाते बाण आणि धनुष्यासारखे असते, असे उपनिषदात म्हटले आहे. अनेक घरात बाप-लेकाचे पटत नाही. श्रीदेवी यांचे तीनशे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे तीनशे शुक्रवार तणावात गेले असतील. त्यांचे पती बोनी कपूर यांनी ३५ चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या प्रदर्शनाचा तणावदेखील श्रीदेवीने सोसला. जनता नेहमी तणावात असते की, आजचा दिवस कसा जाईल. शाळेच्या बसने घरी जाणाऱ्या मुलांचे आई-वडील मुले घरी येईपर्यंत चिंतेत असतात. 

खरं तर, तंत्रज्ञानाच्या या काळात आपली मुले मोबाइलवर ब्ल्यू चित्रफीत तर पाहत नाहीत, याची चिंता आई-वडिलांना असते. अभद्र, अश्लील चित्रपटांना निळी चित्रफितीचे विष म्हटले जाते. तणाव जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूला तणावाशी किंवा पतीसोबत मतभेदाशी जोडणे योग्य नाही. मेलेल्यांना मारणे भित्रेपणा आहे. 

 

तणावात तर सध्या श्रीदेवी यांचे कुटुंब आहे. त्यांचे पती बोनी कपूरची काय अवस्था असेल? दुबईत त्यांना बऱ्याच कार्यालयाच्या चकरा माराव्या लागल्या. बोनी कपूर यांचे नाव अचल आहे, मात्र सध्या ते किती विचलित असतील? असो, श्रीदेवी यांच्या मृत्यूमुळे सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे, कारण बँकेत सतत होणाऱ्या घोटाळ्याच्या बातम्यांचा विसर पडला आहे. झुरळांची शिळ्या पदार्थांवर उत्पत्ती होते आणि त्यावरच ते जगतात. हा झुरळांचा सुवर्णकाळ आहे. 
 

पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देतानाची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...