आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मुलीची उडवली जातेय खिल्ली, सोशल मीडियावर \'सैराट\'सोबत होतेय तुलना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर काही लोकांना पसंत पडतोय. तर अनेक लोक सोशल मीडियावर या ट्रेलरची खिल्ली उडवत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही लोक या चित्रपटाची तुलना मराठी चित्रपट 'सैराट'सोबत करत आहे. एका यूजरने लिहिले की, - 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या मनात सैराटच्या अॅक्टर्ससाठीचा सम्मान जास्त वाढला आहे. या स्टारकिड्सने अॅक्टिंग टिप्स घ्यायला हव्या होत्या. लोकांनी दोन्ही चित्रपटाची तुलना करत अनेक फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये सैराटच्या तुलनेत धडक चित्रपटाला कमी लेखले जाते आहे.


20 जुलैला रिलीज होणार 'धडक' 
राजस्थानी बॅकग्राउंडवर तयार झालेला 'धडक' चित्रपट हा मराठी चित्रपट सैराटचा रिमेक आहे. सैराटमध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरने काम केले होते. तर धडक चित्रपटात जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावर कशी केली जातेय या चित्रपटांची तुलना...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...