आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाचे बजेट पाहून कंगना ठरवते आपली फीस, मणिकर्णिकासाठी घेतले 10 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेपोटिज्म वादामध्ये चर्चेत राहिलेली कंगना रनोट लवकरच आगामी चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'  मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर कमल जैननुसार, नेपोटिज्मच्या वादानंतरही कंगनाची ब्रांड व्हॅल्यू कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी तिला 10 कोटी रुपये मिळाले आहे. तिने या चित्रपटासाठी आपला वेळ दिलाय. यासोबतच खुप घामही गाळला आहे. चित्रपटाची शूटिंग नोब्हेंबर 2017 पासून सुरु झाली होती. तिने वेगवेगळ्या वेळेवर या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 120 दिवस दिले आहेत.


चित्रपटाच्या बजेटनुसार फीस ठरवते कंगना...
कंगनाच्या जवळच्या लोकांनी तिच्या फीसविषयी सांगितले आहे. तिने कंगना अवास्तव मानधन घेत नाही. ती चित्रपटाचे बजेट पाहून चार्ज करते. तिने 'सिमरन' साठी तिने 6-7 कोटी रुपये चार्ज केले. कारण चित्रपटाचे बजेट 25 कोटी होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर रिस्पॉन्स मिळाला नसला तरी, डिजिटल प्लॅटफॉर्म अमेजॉनवर 12 कोटी मध्ये हा चित्रपट विकला गेला. त्याच प्रमाणे 'मेंटल है क्या' हाही रिजनेबल बजेटचा चित्रपट आहे. अशावेळी तिने 8 कोटींपेक्षा जास्त फीस घेतली नाही. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'  या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच कंगनाने फीसमध्ये जवळपास 10 कोटी रुपये घेतले आहे. 


मणिकर्णिकासाठी कंगनाने केली सव्वा वर्षांची प्रतिक्षा
हा चित्रपट तयार होण्यासाठी जास्त काळ लागला नाही. यापुर्वी हा चित्रपट केतन मेहता कंगना रानोटसोबत बनवणार होते. कंगनाने त्यांना हो सांगितले होते. परंतू केतन बजेट जमा करु शकले नाही. यामुळे कंगनाला सव्वा वर्षे वाट पाहावी लागली. नंतर कमल जैन फायनली कंगना जवळ आले. त्यांनी यापुर्वी धोनीचा बायोपिक बनवला होता. ते झी स्टूडिओला बोर्डवर घेऊन आले आणि आता चित्रपट जवळपास तयार होत आला आहे. चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.


महेश्वरमध्ये शूट होणार चित्रपटाचा काही भाग
कंगनाला हा चित्रपट उंच स्केलवर करायचा होता. कारण चित्रपटाचा विषयच तसा होता. जवळपास 'ग्लैडिएटर' आणि 'ब्रेव हार्ट' च्या बजेटचा हा चित्रपट करायचा होता. कमल जैनने यासाठी परिपुर्ण रिसोर्स जमा केले. आता चित्रपटाचे थोडे पॅच वर्क बाकी आहे. यासाठी टीम मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये जातेय. कंगनाशिवाय इतर कलाकारांची शूटिंग येथे होईल. कंगना सध्या मुंबईमध्ये 'मेंटल है क्या' ची शूटिंग करतेय. यानंतर जूनमध्ये चित्रपटाची टीम लंडनला जाणार आहे. येथे एका महिन्याचे शेड्यूल आहे.

 

आलिया, अनुष्का, दीपिका, प्रियांका घेतात 7 ते 12 कोटी...
ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा सांगतात की, कंगना रनोटसोबतच आलिया भट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्राही ए-लिस्टर्स आहेत. या सर्व एका चित्रपटासाठी 7 ते 12 कोटी रुपये चार्ज करतात. विद्या बालनची फीस साडे 4 कोटी ते 6 कोटी यामध्ये असते. कतरिना कैफही 7 कोटी चार्ज करते. ए-लिस्ट मेल अॅक्टर्सची फीस मेल अॅक्ट्रेसपेक्षा खुप जास्त आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, 'मणिकर्णिका' च्या शूटिंग दरम्यानचे काही PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...