आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या वकिलांकडून हृतिक रोशनची पोलखोल; रंगोलीने शेअर केलेला VIDEO व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांमध्ये कंगना रनोट आणि हृतिक रोशन यांच्यातील कॉन्ट्रोव्हर्सीला पुर्णविराम लागला होता. पण पुन्हा एकदा हा वाद उभा झाला आहे. कंगना रनोटची बहीण रंगोलीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये कंगनाचे वकिल रिजवान सिद्धिकींनी हृतिकचा खोटारडेपणा उघड केला आहे. कंगनाने व्हिडिओची लिंक शेअर करुन ट्विट केले, "Please check how our lawyer @RizwanSiddiquee exposed @iHrithik lies in this video"

 

हृतिकने काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला कंगना आणि त्याच्यातील वादावर एक मुलाखत दिली होती. या व्हिडिओच्या आधारावर कंगनाच्या वकिलांनी हृतिकची पोलखोल केली आहे.


1.. या मुलाखतीत हृतिकने म्हटले होते की, 2013 नंतर तो कंगनाला कधीही भेटला नाही. हृतिकच्या या मुद्यावर आपले मत मांडताना कंगनाच्या वकिलांनी काही पुरावे सादर केले ज्यात हृतिक कंगनाच्या बर्थडे पार्टीला हजर होता हे त्याने स्पष्ट केले.
2.. वकिलांनी उलट प्रश्न विचारताना म्हटले, की डिसेंबर 2013 ते जानेवारी 2014 मध्ये हृतिक कुठे होता हे स्पष्ट करण्यासाठी हृतिक त्याचा पासपोर्ट का दाखवत नाही?  


यूट्युबवर रिझवान सिद्दीकी या नावाने 46 मिनिटे 43 सेकंदाचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 18,718  हजार लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला या प्रकरणाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 


गेल्यावर्षी कंगनाने हृतिकचे नाव न घेता त्याला ‘सिली एक्स’ असे म्हटले होते. यानंतर कंगनाने  ‘आप की अदालत’ या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात यावर सविस्तर भाष्य केले होते. सध्या कंगना तिच्या आागमी 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 


पुढील स्लाईडवर बघा, व्हायरल होत असलेला व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...