आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Released Yoga Video From London लंडनच्या सेंट्रल पार्कमध्ये कंगनाने केला कठीण योगासनांचा अभ्यास, रिलीज केला VIDEO

लंडनच्या सेंट्रल पार्कमध्ये कंगनाने केला कठीण योगासनांचा अभ्यास, रिलीज केला VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कंगना रनोटने केला योगाभ्यास

- लंडनहून रिलीज केला स्वतःचा योग व्हिडिओ
- 'मेंटल है क्या'च्या शूटिंगसाठी सध्या आहे लंडनमध्ये..

 

मुंबईः चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री कंगना रनोटने लंडनहून स्वतःचा एक योग व्हिडिओ रिलीज केला आहे. येथील सेंट्रल पार्कमध्ये कंगना कठीण आसन करताना दिसतेय. कंगना सध्या दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदींच्या आगामी 'मेंटल है क्या'च्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार रावची महत्त्वाची भूमिका आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत कंगनाने योगासने केली. 

 

कंगनाला येतात 100 हून अधिक आसन...
- कंगना रनोटचे योग गुरु सूर्यनारायण सिंह हे आहेत. त्यांना कंगना 14 वर्षांपूर्वी भेटली होती. तेव्हापासून नित्यनेमाने कंगना योगा करतेय. कंगनाने  2017 मध्ये गुरु दक्षिणा म्हणून सूर्यनारायण सिंह यांना मुंबईतील अंधेरी येथे दोन कोटींचा फ्लॅट  दिला.  कंगनाच्या योगाभ्यासाविषयी सूर्यनारायण सिंह सांगतात, "कंगनाला योगासनाचे 100 हून अधिक आसन येतात. यापैकी ती दररोज 35 आसन करते. कंगना चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीपासून योग साधना करते."

 

अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगस्थळी गुरुंना सोबत घेऊन जाते कंगना...
- सूर्यनारायण सिंह यांनी सांगितल्यानुसार, कंगनाला सर्व योगाभ्यास माहित आहे. पण अॅक्शन चित्रपटांच्या शूटिंगवेळी ती कायम त्यांना सोबत घेऊन जात असते. सूर्यनारायण सांगतात, " 'कृष3'च्या वेळी ती मला सोबत घेऊन गेली होती. 'मणिकर्णिका'च्या शूटिंगस्थळीदेखील तिने मला बोलावून घेतले होते. त्यावेळी ती जखमी झाली होती. स्पाइनमध्ये तिला दुखापत झाली होती. योगाच्या मदतीने ती लवकर बरी झाली.' कंगनाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती योगाच्या माध्यमातून सध्या स्टेमिना आणि ब्रिदींग कॅपेसिटी वाढवण्याकडे लक्ष देतेय.  याचे कारण  म्हणजे दिग्दर्शक अश्वनी अय्यर तिवारींच्या आगामी चित्रपटात ती कबड्डी खेळाडूची भूमिका वठवणार आहे.

 

जेव्हा कंगना म्हणाली होती, - कमी होत चालला आहे जीवन जगण्याची मोह 
- कंगना रनोटने एका मुलाखतीत  म्हटले होते, की आयुष्यात अनेक खस्ता खाल्यानंतर तिचा जीवन जगण्याचा मोह कमी होत चालला होता. याचदरम्यान तिने स्वामी विवेकानंद आणि योगविषयी वाचले आणि तिचा आत्मविश्वास वाढला.त्यानंतर तिने योगाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनवला. कंगनाने सांगितले होते की, याकाळात ती दोन वर्षे साध्वीप्रमाणे आयुष्य जगली होती. 


पुढील स्लाईड्सवर बघा, योगासन करताना कंगना रनोटची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...