आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangna Reunite With His Mentor Anurag Basu For Imali, Shooting Will Start At December

अनुराग बसुची लव्ह स्टोरी 'इमली'मध्ये दिसणार कंगना, 12 वर्षांपुर्वी 'गँगस्टर'मधून केले होते लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : डायरेक्टर अनुराग बसुने 2006 मध्ये क्राइम ड्रामा 'गँगस्टर' चित्रपटातून कंगनाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 12 वर्षांपुर्वी दिसलेली ही जोडी चौथ्या चित्रपटात एकत्र काम करणार आहे. अनुरागच्या आगामी चित्रपटाचे टायटल इमली हे आहे. या लव्ह स्टोरीमध्ये कंगना रनोट लीड रोलमध्ये असणार आहे. चित्रपटाचे प्री शूट ऑगस्टमध्ये सुरु होईल. डिसेंबर 2018 मध्ये हा चित्रपट फ्लोरवर येईल. चित्रपटाचा मेल अॅक्टर अजून फायनल झालेला नाही.

 
या चित्रपटात केले आहे काम
- अनुराग बसु आणि कंगनाची जोडी सर्वात पहिले 2006 मध्ये गँगस्टरमध्ये दिसली होती. यामध्ये कंगनासोबत इमरान हाशमी आणि शाइनी आहूजा होते.
- दूसरा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या लाइफ इन ए मेट्रो हा होता. यामध्ये धर्मेंद्र, नफीसा अली, शिल्पा शेट्टी, शायनी आहूजा, कंगना रनोटसारखे स्टार होते.
- 2010 मध्ये कंगनाने राकेश रोशनचा चित्रपट काइट्समध्ये एकत्र काम केले होते. ऋतिक रोशन आणि बारबरा मोरीच्या या चित्रपटात कंगनाने आपल्या भूमिकेला हायलाइट न करण्याचे व्यक्तव्य केले होते.


"अनुराग माझे गॉडफादर आहेत"
- कंगानाने इमलीमधील आपल्या भूमिकेविषयी सांगितले की, "चित्रपटाविषयी सध्या काही सांगणे खुप घाई होईल. हा चित्रपट या वर्षांच्या शेवटी सुरु होईल. मी एवढेच म्हणून शकते की, अनुराग माझे गॉडफादर आहेत. मी आज जे काही आहे, त्यांच्यामुळे आहेत. मी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची वाट पाहू शकत नाही."
- परंतू अनुराग आणि कंगना यांच्यामध्ये काइट्सच्या शूटिंगनंतर दूरावा आला होता. यामध्ये कंगनाने अनुरागवर आरोप लावले होते की, त्यांनी चित्रपटात तिच्या भूमिकेला सोबतच्या भूमिकेपेक्षा जास्त महत्त्व दिले नाही. यानंतर क्वीन चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनुरागने कंगनाला फोन करुन तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

 

कबड्डी प्लेअर बनणार कंगना
- अश्विनी अय्यर तिवारीच्या कब्बडीवर तयार होणा-या चित्रपटासाठी कंगना सध्या योगा आणि कबड्डीची ट्रेनिंग घेत आहे. या चित्रपटाची शूटिंग अक्टोबर मध्ये सुरु होईल. या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर इमलीची शूटिंग सुरु होईल.
- सध्या कंगना लंडनमध्ये एकता कपूरचा चित्रपट मेंटल है क्याची शूटिंग करत आहे. यामध्ये तिच्यासोबत राजकुमार रावही आहेत.
- कंगना 'मणिकर्णिका' चित्रपटातून प्रोड्यूसर म्हणून डेब्यू करतेय. हा चित्रपट ऑगस्ट 2018 मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये ती झांसीची राणी लक्ष्मी बाईची भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...