आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK टी-20 टुर्नामेंटमध्ये कपिलचा परफॉर्मन्स, सेना-मनसे म्हणाली- देशासाठी नाही पैशासाठी काम करतो कॉमेडियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा बुधवारी दुबईमध्ये झालेल्या पाकिस्तान सुपरलीग टी-20 टूर्नामेंटच्या लॉन्चिंग सेरेमनीमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तान सीमेवर ताणावाची परिस्थिती सुरु असताना त्याने पाकिस्तानसाठी परफॉर्म केले. भारतामध्ये पाकिस्तानी स्टार्टच्या परफॉर्मंसवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तर तिकडे कपिल शर्मा पाकिस्तानसाठी फरफॉर्म करतोय. या सेरेमनीमध्ये पाकिस्तानी आणि दूसरे इंटरनॅशनल क्रिकेटर्स उपस्थित होते. कपीलच्या परफॉर्मंसची तिकडे प्रशंसा झाली असली तरीही भारतात त्याच्यासाठी अडचणी उभ्या राहू शकतात.


शिवसेनेचा विरोध
- कपिलच्या परफॉर्मेंसविषयी शिवसेनेने विरोध दर्शवलाय. सेनेचे म्हणणे आहे की, कपिलने काही पैशांसाठी देशाचा अपमान केलाय. त्याला फक्त पैसा कमवायचा आहे. त्याला देशाशी काही देणेघेणे नाही.

 

मनसेने घेतला मोठा निर्णय
- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) ने कपिलच्या या परफॉर्मेंचा विरोध केलाय.
- मनसेच्या एका नेत्याने चॅनलसोबत बोलताना म्हटलेय की, "कपिलला स्वतःवर लाज वाटली पाहीजे. पाकिस्तानी क्रिकेटर्सने आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी आहे. परंतू कपिल त्यांच्यासाठी परफॉर्मंस करतोय. या घटनेनंतर मी कपिलचा कोणताच कार्यक्रम पाहणार नाही आणि दूस-या लोकांनाही तेच सांगेल."
- 2008 मध्ये मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सना आयपीलएलमध्ये सहभागी होण्यावर बंदी घातण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्यामुळे पाकिस्तानसोबत होणारी दूसरी सीरीज खेळणे बंद केले होते.

 

पुन्हा होतेय पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी
- सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या उडी आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावर बंदी घातण्यात आली होती. नंतर ही बंद हटवण्यात आली. परंतू आता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे.
- भाजपा खासदार बाबुल सुप्रियोने 'वेलकम टू न्यूयॉर्क' मधील 'इश्तेहार' हे गाणे बॅन करण्याची मागणी केली आहे. कारण हे गाणे पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खान यांनी गायले आहे.
- खासदारांचे म्हणणे आहे की, भारत-पाक बॉर्डवर तणाव सुरु असताना त्यांच्या देशातील कलाकारांना काम देऊ नये. सुप्रिया यांनी राहत फतेह अली खान यांचा आवाज काढून टाकण्याची मागणी केली आहे.

 

टीव्हीवर परतण्याच्या तयारीत आहे कपिल
- 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' नंतर कपिल शर्मा पुन्हा टीव्हीवर परतणार आहे. 
- त्याच्या नवीन शोचे नाव 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' आहे. हा शो लवकरच सोनी एंटन्टेमेंट  चॅनलवर टेलीकास्ट होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पाकिस्तानसाठी फरफॉर्म करणा-या कपिलचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...