आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Look: करीनाला आवडला नाही सावत्र मुलीचा \'केदारनाथ\' मधला लूक, तिला दिले आपले एक्सपर्टस्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आपली सावत्र मुलगी सारा अली खानचा लुक बदलण्यासाठी करीना कपूरने आपले मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट लावले आहेत. 'केदारनाथ' हा सारा अली खानचा पहिला चित्रपट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात साराची हेअरस्टायइल करीनाला आवडली नाही. आता साराचा पुढचा चित्रपट सिम्बामधील तिचा लूक चांगला असावा यासाठी करीनाने आपल्या एक्सपर्ट्सची मदत घेतली आहे. आता 'सिम्बा' चित्रपटात साराचा मेकअप आणि हेअर स्टाइल करीनाचे मेकअप आर्टिस्ट पॉम्पी करणार आहेत. करीनाला वाटते की, सारा आपल्या पुढच्या चित्रपटात जास्त यंग दिसावी.


सुशांतसोबत करणार डेब्यू
'केदारनाथ' चित्रपटात सारा अली खान ही सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 28 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या तारखेला रजनीकांत आणि अक्षय कुमारचा '2.0' चित्रपटही रिलीज होणार आहे. तर 'सिम्बा' चित्रपटात सारा आणि रणवीर सिंहची जोडी दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी 28 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सारा ही सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी आहे. तरीही करीना आणि सारामध्ये चांगली बॉन्डिंग आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...