आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट असतानाच 'वीरे दी वेडींग'चे शूटिंग करणार होती करीना, पण मेकर्सना पाहावी लागली वाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करिना कपूर खान आपला आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' चित्रपट बेबी बंपसोबत शूट करणार होती. या चित्रपटात तिला 6 महिन्याच्या प्रेग्नेंट महिलेची भूमिका करायची होती पण नंतर हा प्लान ड्रॉप करण्यात आला याचे कारण म्हणजे भारतात फॉरेनप्रमाणे शूटिंगदरम्यान प्रेग्नेंसीच्या दरम्यान मॅटर्निटी इंशोरंस सुवुधा   नसते त्यामुळे करीनाने शूटिंग करणे टाळले. करीनाने चित्रपटाच्या प्रमोशनल इवेंटमध्ये हे सर्व सांगितले. प्रेग्नेंसीमुळे घ्यावा लागला ब्रेक...

 

करीनाने सांगितले की चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वीच ती प्रेग्नेंट होती आणि त्यानंतरच मेकर्सनी तिला सहा महिन्याची प्रेग्नेंट दाखवण्याचा विचार केला होता. करीनाच्या प्रेग्नेंसीनंतर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आले होते. यासाठी तीन महिन्याचा वेळ लागला. पण ही आयडीया कामी आली नाही.

 

तैमूरच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर केले शूटिंग...

करीनाने सांगितले की तैमूरच्या जन्माच्या सहा महिन्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत झाले आणि शूटिंग शेड्युल्समुळे करीनाना दिल्लीला यावे-जावे लागत असे. यावेळी मेकर्सनेही तिची खास काळजी घेतली. या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या काही सीन्सचे फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...