आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ गँगरेपवर बोलली करीना तर लोक म्हणाले - मुस्लिमसोबत लग्न केले, लाज बाळग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या गँगरेप आणि मर्डरमुळे प्रत्येक व्यक्ती हादरला आहे. बॉलिवूड स्टार्सही आपापल्या पध्दतीने या घटनेविरुध्द आवाज उठवत आहेत. शनिवारी करीना कपूरनेही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत या घटनेविरुध्द आवाज उठवला. तर काही लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. अनेक सोशल मीडिया यूजर्सने करीनाच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, तुला लाज वाटती पाहिले एक हिंदू असूनही मुस्लिमसोबत लग्न केले आणि आपल्या मुलाचे नावही इस्लामी शासकाच्या नावावरुन ठेवले. करीनाची खास मैत्रिण स्वरा भास्करने यावर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.


काय होते स्वराचे उत्तर...
स्वराने ट्वीटमध्ये लिहिले, "तुम्ही या जगात आहात याची तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्हाला देवाने तिरस्काराने भरलेला मेंदू आणि वाईट तोंड दिले याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही देश आणि हिंदूच्या नावावर कलंक आहात. पब्लिसिटीसाठी अशा गोष्टी बोलण्याची हिंमत तुम्हाला सरकारकडून मिळाली आहे का"

 

करीनाने कठुआ गँगरेपवर असा व्यक्त केला राग
करीनाने इंस्टाग्रामवर जो फोटो शेअर केला. यामध्ये ती एक बोर्ड पकडून उभी आहे. यावर तिने "मी हिंदूस्तानी आहे आणि लाजिरवाणी आहे. माझ्या मुलीला न्याय द्या. 8 वर्षीय मुलीचा गँगरेप आणि मर्डर देवस्थळावर." यामुळेच तिला लोकांनी ट्रोल करणे सुरु केले होते.

 

वीरे दी वेडिंगमध्ये एकत्र काम करतेय करीना आणि स्वरा
- करीना कपूर आणि स्वरा भास्कर सध्या शशांक घोषच्या डायरेक्शनमध्ये तयार होत असलेल्या 'वीरे दी वेडिंग' मध्ये एकत्र काम करतेय. 1 जून 2018 ही चित्रपटाची रिलीज डेट आहे. करीना आणि स्वरासोबत सोनम कपूर, आशीष चौधरी आणि विवेक मुश्रान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता, स्वरा भास्करचे ट्वीट आणि दूस-या बॉलिवूड सेलेब्सने कठुआ गँगरेपविरुध्द शेअल केलेले फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...