आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karni Sena Decided To Back Sarv Brahmin Mahasabhas Protest Against The Historical Tampering Of Jhansi Ki Rani

आता \'मणिकर्णिका\'चा विरोध करेल करणी सेना, ब्राम्हणांना देत आहे पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावत' नंतर आता कंगना रनोटचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका' वादाच्या भोव-यात अडकला आहे. या चित्रपटावर आरोप आहे की, यामध्ये झाशीच्या राणीला चुकीच्या पध्दतीने मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राम्हण महासभा या चित्रपटाचा विरोध करत होती. आता करणी सेनाही विरोध करत आहे. करणी सेनेने काही काळापुर्वी 'पद्मावत' विरुध्दची त्यांची भूमिका परत घेण्याची मागणी केली होती. आणि आता करणी सेना पुन्हा या चित्रपटाला विरोध करत आहे. 


ब्राम्हणांनीही करणी सेनेला दिली होती साथ
राजपूत करणी सेनेचे फाउंडर लोकेंद्र सिंह काल्वी याविषयी म्हणाले की, "जर ब्राम्हणांचे रक्त वाहत असेल तर राजपूत का गप्प बसेल. राजपूतांचे रक्त वाहिले तेव्हा ब्राम्हण कधीच गप्प बसले नाही." यासोबतच त्यांनी दावा केला की, 'पद्मावत' चा विरोध केला जात असताना 10 हजार पत्रांवर ब्राम्हणांनी आपल्या रक्तानी सही केली आणि विरोध केला. 

 

काय आहेत आरोप?
ब्राम्हण महासभांचा आरोप आहे की, चित्रपटात राणी लक्ष्मी बाईचे ब्रटिश ऑफिसरसोबत संबंध दाखवण्यात आले आहेत. महासभेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेश मिश्रांनुसार चित्रपटाचा काही भाग लंडन बेस्ड ऑथर जय श्री मिश्रा यांच्या 'राणी' या पुस्तकातून घेतला आहे. यूपी सरकारने हे पुस्तक त्यावेळी बॅन केले होते. मग अशा पुस्तकातून चित्रपटाचे काही अंश का घेण्यात आले. चित्रपटाची शूटिंग सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कंगनाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...