आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावत\' विरुद्ध मुंबईत करणी सेनेचा सेन्सर बोर्डाला घेराव, म्हटले \'चित्रपट रिलीज होऊ देणार नाही\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'पद्मावत' विरुद्ध राजपूत संघटनांचा विरोध राजस्थानमधून बाहेर पडत मुंबईपर्यंत येऊन ठेपला आहे. जवळपास 50 ते 100 राजपूतांनी सेन्सर बोर्डाच्या ऑफिसला घेराव घातला. यावेली पोलिसही तिथे उपस्थित होते.  राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे जीवन सिंह सोलंकी यांनी आमच्या प्रतिनीधींशी बोलताना सांगितले की, सेन्सर बोर्डाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी सेनेचे अनेक सदस्य मुंबईत येत आहेत आणि पोलिसांनी जर आम्हाला घेराव घालण्यास मज्जाव केला तर आम्ही मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत असे सांगितले. 

 

सोलंकी यांनी सांगितले की, केवळ चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे पण कथेच कोणताच बदल करण्यात आला नाही. सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी सांगितले की, आम्ही पद्मावत चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. चित्रपटाबाबत नाराज आहे राजपूत संघटना...

 

राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चित्रपटाचे प्रदर्शन बॅन केले आहे. राजस्थान वगळता संपूर्ण देशभरात हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर प्रसुन जोशी यांचे एक वक्तव्य समोर आले आहे की, चित्रपटाचे नाव वगळता चित्रपटात कोणताही कट करण्यात आलेले नाही त्यामुले करणी सेना नाराज झाली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, चित्रपटाचे नाव 
'पद्मावत' ठेवून काही बदलणार नाही कारण लोकांना माहीत आहे की, चित्रपटात राणी पद्मिनीचीच कथा दाखविली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेचे एक प्रतिनीधी मंडळ देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध करणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेन्सर बोर्डावर राजपुतांच्या घेरावाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...