आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावत\' पाहून गर्व वाटला! करणी सेनेला उपरती, राजस्थानसह इतर 3 बॅन राज्यांतही प्रदर्शित होऊ देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  राजपूत करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'पद्मावत' बद्दल मोठी घोषणा केली आहे. करणी सेनेचे कार्यकर्ता योगेंद्र सिंहने युटर्न घेत लिहीले आहे की, 'पद्मावत' विरुद्ध असलेला करणी सेनेचा विरोध ते वापस घेत आहेत. हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या आदेशावरुन घेण्यात आला आहे. चित्रपटात नाही कोणताच ड्रिम सिक्वेंस..

 

- करणी सेनेने पद्मावत चित्रपटात मेवाडची राणी पद्मावती आणि दिल्लीचा शासक अल्लाउद्दीन खिल्जीमध्ये कोणताच ड्रिम सिक्वेंस नसल्याचे समजले आहे. राजपूत लोकांच्या भावना दुखावल्या जातील अशाप्रकारचे काहीच चित्रपटात नसल्याने आता करणी सेनेने चित्रपट राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये रिलीज करण्यास कोणताही विरोध नसल्याचे सांगितले आहे.

- करणी सेनेने घेतलेली ही माघार पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे कारण 25 जानेवारी रोजी रिलीज झालेला हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादात अडकला होता. या चित्रपटावरुन इतका गदारोळ माजला होता की करणी सेनेने जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, शाळेच्या बसवर हल्ला अशा प्रकारचे गैरवर्तन केले होते. पण आता इतर 4 राज्यांत हा चित्रपट रिलीज होत असल्याने चित्रपटाच्या टीमसाठी ही आनंदाची बाब आहे.

 

पद्मावतने या चार राज्यांत चित्रपट रिलीजविना 114 कोटींची कमाई केली आहे आता या कमाईचा आकडा अजूनच वाढणार यात शंका नाही.

 

पुढच्या  स्लाईडवर पाहा, करणी सेनेने लिहीलेले पत्र..

बातम्या आणखी आहेत...