आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय लीला भंसाळीची फिल्म 'पद्मावत' ला विरोध सुरुच आहे. राजपूत करणी सेनाने शुक्रवारी सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशीला जयपूर साहित्य संमेलनाला न येण्याची धमकी दिली आहे. करनी सेना म्हणाली आहे की, जर ते जयपुरला आले तर 'वाईट पध्दतीने मारहाण' होईल. करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेदीने एक व्हिडियो मॅसेजच्या माध्यमातून सांगितले की, फिल्म रिलीज करणारे आणि फिल्मच्या समर्थनार्थ काहीही बोलणा-यांना जयपूरमध्ये प्रवेश मिळणार नाही. ते म्हणाले की, फिल्मचे नाव 'पद्मावती'पासून 'पद्मावत' केल्यानेही ते खुश नाही. त्यांना पुर्ण फिल्मवर बंदी आणायची आहे.
- त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या केसची दखल घेण्याचा आग्रह केला आणि या फिल्मवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्ड हे सरकारमध्ये येते. यामुळे या फिल्मवर बंदी आणण्यासाठी सरकारने काही कारवाई करावी.
- त्यांनी तक्रार करत सांगितले की, भंन्साळीने सांगितले होते की, फिल्म तयार झाल्यानंतर करणी सेनेच्या सदस्यांना दाखवण्यात येईल. परंतू त्यांनी फिल्मचा ट्रेलर रिलीज केला तसेच घूमर गाणेही न दाखवताच रिलीज केले. हे चुकीचे आहे.
- त्यांनी आरोप केला की, सरकार हे हिंदू आणि मंदिरांविषयी फक्त वोट मिळवण्यासाठीच बोलतात. करणी सेनेचे प्रवक्ता विजेंद्र सिंहने सांगितले की, ज्या प्रमाणे भंसालीचे स्वागत केले होते त्याच प्रकारे जयपुरमध्ये प्रसून जोशीचे 'स्वागत' केले जाईल. त्यांना या शहरात येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
- भन्साळीला कानाखाली दिली होती. परंतू जोशीला वाईट पध्दतीने मारले जाईल. त्यांनी सांगितले की, फिल्म रिलीज विरुध्द उत्तर प्रदेशामध्ये राष्ट्रीय राजमार्ग 3 हा बंद करण्यात आला आहे. करणी सेना 25 जानेवारीला भारत बंदचे आव्हान करेल. भारत बंद प्रभावशाली करण्यासाठी लोकेंद्र सिंह कल्वी त्या दिवशी मुंबईमध्ये उपस्थित राहतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन क्लिक करुन काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.