आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कित्येक हवेलींची मालकीण आहे चंद्रमुखी चौटाला, TVपासून दूर जाऊन करतेय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता पंजाबी फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने हनुमानगड येथे आली होती. - Divya Marathi
कविता पंजाबी फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने हनुमानगड येथे आली होती.

मुंबई/हुनमानगड (राजस्थान) - FIR सीरियलमधून घराघरात ओळखली जाणारी चंद्रमुखी चौटाला अर्थात अभिनेत्री कविता कौशिकचे म्हणणे आहे की पंजाबी फिल्ममध्ये हिंदीपेक्षा वेगळे विषय हाताळले जात आहेत. पंजाबी कथांमध्ये नाविन्य आहे, यामुळे पंजाबी फिल्ममध्ये काम करत असल्याचे कविताने सांगितले. फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने येथे आलेल्या कवितासोबत रविवारी DivyaMarathi.com ने बातचीत केली. रविवारी हॉटेल ग्रँड इन येथे झालेल्या खास बातचीतमध्ये कविताने सांगितले, की पंजाबी फिल्म 'ननकाना'मध्ये ती एका वेगळ्या रुपात समोर येणार आहे. कविता म्हणाली, 'गुरदास मान मला पित्या समान आहेत, मात्र 'ननकाना' फिल्ममध्ये मी त्यांची पत्नी अमृत कौरच्या भूमिकेत आहे.'

 

Q- राजस्थानची संस्कृती कशी वाटली, राजस्थान कसे वाटले? 
- राजस्थानसोबत माझे फार जुने नाते आहे. माझे वडील अलवर जिल्ह्यातील मांडण गावचे आहेत. आमच्या आजही येथे हवेली आहेत, माझ्या भावासह अनेक नातेवाईक आजही येथे राहातात. राजस्थान माझ्या रोमारोमात आहेत. 

 

Q- हरियाणवी रोलनंतर पंजाबी फिल्ममध्ये काम करताना कसे वाटत आहे? 
- पंजाबी फिल्ममध्ये काम करणे नक्कीच चांगेल वाटत आहे. याआधीही पंजाबी फिल्मच्या ऑफर मला येत होत्या. तेव्हा एफआयआर सीरियलमध्ये व्यस्त असल्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र आता वेख बरातां चल्लियां यांनी स्क्रिप्ट ऐकवली आणि तत्काळ पंजाबी फिल्मला मी होकार दिला. पंजाबी फिल्ममध्ये काम करत असल्यामुळे पंजाबी देखील शिकत आहे. 

 

Q - बेटी बचाओ अभियानाबद्दल तुझे काय मत आहे?
- ज्या देशात मुली आणि महिलांचे देवीच्या रुपात पुजन केले जाते. त्याच देशात बेटी बचाओचा नारा द्यावा लागतो, हे वाईट आहे. महिलांची मानसिक शक्ती ही पुरुषांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे. इश्वराने स्त्री आणि पुरुष यांना समान, बॅलेन्स बनवले आहे. तो बॅलेन्स लोकांनी बिघडवला नाही पाहिजे. याबद्दल सर्वांची सकारात्मक दृष्टी असली पाहिजे. 


पुढील स्लाइडमध्ये पाहा चंद्रमुखी चौटालाचे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...