आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Krishna Abhishek Wife Kashmira Shah 14 Failed Pregnancy Attempts, Now Going To Adopt Girl Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 वेळा अपयशी ठरली या अभिनेत्रीची प्रेग्नेंसी, सरोगसीच्या माध्यमातून झाली आई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कॉमेडिअन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह मे 2017मध्ये जुळ्या मुलांचे आईवडील झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. आता कृष्णा आणि कश्मिरा मुलीला दत्तक घेणार आहेत. कश्मिराने अलीकडेच एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "आम्हा दोघांनाही एक बेबी गर्ल हवी आहे आणि आता जुळ्या मुलांनंतर घरात लहानग्या परीची एन्ट्री व्हावी अशी आमची इच्छा आहे."

 
14 वेळा अपयशी ठरली कश्मिराची प्रेग्नेंसी...

- मुलं आणि प्रेग्नेंसीविषयी बोलताना कश्मिरा म्हणाली, "फॅमिली प्लानिंगसाठी मी इंडस्ट्रीतील काम कमी केले होते. तीन वर्षे प्रेग्नेंसी राहावी यासाठी मी प्रयत्न करत होते, पण नेहमी अपयश पदरी पडले." 
- "जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भ राहात नाही, तेव्हा खूप अडचण येते. यामुळे माझ्या तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. मी बाळासाठी IVF तंत्रज्ञानाची मदत घेतली होती."
- "तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तब्बल 14 वेळा माझा प्रेग्नेंसी अटेंप्ट अपयशी राहिला. यासाठी मी IVF इंजेक्शनचीही मदत घेतली होती. त्यामुळे माझे वजन खूप वाढले होते." 
- "वजन वाढल्यानंतर ते कमी करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. माझी कंबर 24 हून 32ची झाली होती. हा संपूर्ण काळ माझ्यासाठी अतिशय वेदनादायी होता. पण मी हार मानली नाही." 
- "याकाळात वाढलेल्या वजनावरुन माझ्यावर लोकांनी टीका केली. लोक म्हणायचे, फिगरसाठी प्रेग्नेंट होत नाहीये, पण त्यांना सत्य कुठे ठाऊक होते. बाळासाठी मी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले आहेत." 
- "मी त्या सरोगेट मदरची कायम आभारी राहील. तिने माझ्या मुलांना जन्म दिला आणि एवढा त्रास सहन केला."


सलमानने दिला कश्मिरा-कृष्णाला बाळ दत्तक घेण्याचा सल्ला...
- कृष्णा आणि कश्मिराला बाळ दत्तक घेण्याचा सल्ला सलमान खानने दिला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून होत असल्याचे सर्वप्रथम सलमानलाच ठाऊक होते.
- कश्मिराच्या जुळ्या मुलांपैकी एकाचे नाव सुल्तान आहे. खरं तर त्यांची खरी नावे रयान आणि कृष्णांक अशी आहे. पण रयानला घरी सगळे सुल्तान म्हणतात.
- जन्माच्या वेळी रयानची प्रकृती ढासळली होती. एवढ्या कमी वयात त्याने रुग्णालयात मृत्यूशी लढा दिला आणि तो यात विजयी ठरला. त्यामुळे सगळे त्याला घली सुल्तान म्हणतात.
- कश्मिराने मुलाखतीत पुढे सांगितले, "आम्ही आता मुलगी दत्तक घेणार आहोत. किंवा देवाची कृपा झाल्यास, मी स्वतः प्रेग्नेंट राहिली. कसेही असो, आमच्या घरात आता लहान परी नक्की येणार आहे." 
- "मुलीसाठी आम्ही सरोगसीचीही मदत घेऊ शकतो. जर हे शक्य झाले नाही, तर मुलगी दत्तक नक्की घेणार."


पुढे वाचा, One-Night Stand नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते कश्मिरा-कृष्णा...  

बातम्या आणखी आहेत...