Home | News | Lalu Prasad Yadavs son Tej Pratap Yadav to make his debut in Bollywood

FIRST LOOK: लालू प्रसाद यादवांचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये डेब्यू, ऐश्वर्या रायसोबत केलंय लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 27, 2018, 05:31 PM IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आ

 • Lalu Prasad Yadavs son Tej Pratap Yadav to make his debut in Bollywood

  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तेजप्रताप यादवने बुधवार त्याच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर तेजप्रतापने त्याच्या आगामी 'रुद्रा- द अवतार' या चित्रपटाचे पहिले पोस्टर ट्वीट केले. पोस्टरवर तो एविएटर चश्मा घालून दिसतोय.


  29 वर्षीय तेजप्रताप पहिल्यांदा हीरोच्या रुपात हिंदी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. 2016 मध्ये आरोग्य मंत्री असताना त्याने एका भोजपुरी चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका वठवली होती. तेजप्रतापच्या या नवीन चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेजप्रताप यादव वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो.


  मे महिन्यात अडकला लग्नाच्या बेडीत...
  बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याशी याचवर्षी 12 मे रोजी तेजप्रताप लग्नगाठीत अडकला आहे. एप्रिल महिन्यात पाटण्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.

 • Lalu Prasad Yadavs son Tej Pratap Yadav to make his debut in Bollywood

  याचवर्षी 12 मे रोजी ऐश्वर्या राय हिच्याशी तेजप्रताप यादवचे लग्न झाले.

 • Lalu Prasad Yadavs son Tej Pratap Yadav to make his debut in Bollywood

  तेजप्रताप यादव हा लालू प्रसाद यादव यांचा थोरला मुलगा असून 29 वर्षांचा आहे. 

Trending