आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: स्वतःला सुंदर समजत नव्हत्या शमशाद बेगम, के. एल. सहगल यांच्या होत्या चाहत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कही पे निगाहे कही पे निशाना’, ‘मेरे पिया गये रंगून’, ‘कभी आर कभी पार’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘लेके पहला पहला प्यार’ यासारख्या गीतांना आपल्या मधूर आवाजाने अजरामर करणार्‍या भारतीय चित्रपट सृष्टीतील जुन्या काळच्या महान पार्श्‍वगायिका शमशाद बेगम यांची आज (14 एप्रिल) 99 वी जयंती आहे. 14 एप्रिल 1919 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 24 एप्रिल 2013 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी याजगाचा निरोप घेतला होता.

 

गतकाळातील चुलबुली अभिनेत्रींचा शमशाद बेगम आवाज होत्या. त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेतील तब्बल पाचशेहून अधिक गाणी आपल्या आवाजात स्वरबद्ध केली होती. त्यापैकी अनेक गाणी आजसुद्धा सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत.

 

के. एल. सहगल यांच्या होत्या चाहत्या.. 
शमशाद बेगम यांचा जन्म 14 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. बालपणापासूनच त्या के. एल. सहगल यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्यांचा 'देवदास' हा सिनेमा शमशाद बेगम यांनी एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल चौदा वेळा बघितला होता.

 

अशी झाली होती करिअरची सुरुवात... 
शमशाद बेगम यांनी आपल्या सिगिंग करिअरची सुरुवात 16 डिसेंबर 1947 रोजी लाहोर येथील पेशावर रेडिओमधून केली. शमशाद बेगम यांच्या कर्णमधूर आवाजाने प्रसिद्ध संगीतकार नौशाद आणि ओ.पी. नय्यर यांचे लक्ष त्यांच्याकडे खेचले गेले. त्यांनीच शमशाद बेगम यांना सिनेमात पार्श्वगायनाचा पहिला ब्रेक दिला होता. त्यानंतर शमशाद बेगम यांच्या आवाजाने सिनेरसिकांना घायाळ केले. 50, 60 आणि 70च्या दशकात शमशाद बेगम संगीतकारांची पहिली पसंत होत्या.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, शमशाद बेगम यांच्याविषयी आणखी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...