आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lisa Ray Send Love To Cancer Survival Sonali Bendre Whaya Twitter With An Emotional Msg

कँसरला हरवणा-या लीजा रेचा सोनाली बेंद्रेला इमोशनल मॅसेज - तुझ्याविषयीच विचार करतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनाली बेंद्रेला हायग्रेड कँसर झालाय आणि सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतेय. हे वृत्त जाणून घेतल्यानंतर संपुर्ण बॉलिवूड सोनालीसाठी प्रार्थना करत आहे. कँसरचा सामना केलेली अभिनेत्री लीजा रेनेही सोनालीसाठी मॅसेज लिहिला आहे. लीजाने लिहिले की, डियर सोनाली बेंद्रे, मी तुझ्याविषयीच विचार करतेय. माझ्याकडे बोलण्यासाठी जास्त शब्द नाही. फक्त तुझ्यासाठी खुप प्रेम पाठवायचे आहे.


2009 मध्ये लीजाला झाला होता कँसर 
2009 मध्ये लीजाला मल्टीपल माइलोमा कँसर झाला होता. हा व्हाइट ब्लड सेल्सचा कँसर असतो. यानंतर एक वर्षे लीजावर उपचार चालले. या मदतीने तिने कँसरला हरवले.


मनीषा कोइरालानेही दिला होता मॅसेज
अभिनेत्री मनीषा कोइरालानेही कँसरशी सामना केला आहे. तिने सोनाली बेंद्रेच्या चांगल्या आरोग्यासाठी मॅसेज दिला होता. मनीषाने लिहिले होते की - देवाच्या कृपेने तु लवकरच बरी होऊन परतशील. तुझ्यासाठी प्रेम आणि शुभेच्छा. मनीषाच्या या मॅसेजवर सोनालीने उत्तर दिले होते की, "थँक्यू मनीषा, तु तर माझी प्रेरणा आहेस."

 

मनीषाला झाला होता ओवेरियन कँसर 
मनीषा कोईरालाला डिसेंबर, 2012 मध्ये ओवरियन कँसर झाला होता. यानंतर ती सर्जरीसाठी अमेरिकेत गेली होती. न्यूयॉर्कमध्ये जवलपास 6 महिने तिच्यावर उपचार चालले. कँसरला हरवल्यानंतर मनीषा आता सामान्य आयुष्य जगतेय. नुकत्याच रिलीज झालेल्या 'संजू' चित्रपटात मनीषाने नरगिसची भूमिका साकारली आहे.


- संजय दत्तची आई नरगिस यांचा मृत्यूही कँसरमुळे झाला होता. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...