आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या इंग्लंड टूरच्या काळात अनुष्काने शेअर केला रोमँटिक फोटो, विराटसाठी लिहिली मनातील गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या नवरा विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती विराटसोबत सन थीममध्ये दिसतेय. फोटोवर तिने 'Day out with my beauty!'असे कॅप्शन दिले आहे. ती विराटमागे उभी राहून हसताना दिसतेय. विराट ऑफ व्हाइट टी-शर्टमध्ये दिसतोय. टीम इंडियाने इंग्लंड दौ-यावर टी-20 सीरिज जिंकली आहे. सध्या ते वनडे सीरिज खेळत आहेत. यानंतर टीम इंडिया टेस्ट सीरीज खेळणार आहे.

 

नॉटिंघममध्ये विराटला केले होते फ्लाइंग Kiss
नॉटिंघम वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लँडला हरवले होते तेव्हा अनुष्काने पवेलियनमधून विराटला फ्लाइंग किस केले होते. ती पवेलियनमध्ये शिखर धवनच्या बायकोसोबत होती. या मॅचमध्ये विराटने 75 रन काढले होते. लॉर्ड्स वनडेमध्ये इंग्लंडने भारताला वाईट पध्दतीने धूळ चारली होती. 


शूटिंगमधून फ्री आहे अनुष्का
अनुष्का सध्या शूटिंगमधून फ्री आहे. ती 'सुई धागा: मेड इन इंडिया' आणि 'झिरो' चित्रपटाची शूटिंग संपवून विराटसोबत इंग्लँडमध्ये आली आहे. 'सुई धागा: मेड इन इंडिया' मध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. तर 'झीरो' चित्रपटात ती शाहरुख खान आणि कतरिना कौफसोबत दिसणार आहे. तिने राजकुमार हिरानीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या 'संजू' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...