आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madame Tussauds Museum Delhi Make Over Anil Kapoor Wax Statue For Daughter Wedding

मुलीच्या लग्नासाठी अनिल कपूरच्या स्टॅच्यूचा झाला मेकओव्हर, दिला ट्रेडिशनल लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याची मुलगी सोनम कपूर 8 मेला विवाह बंधनात अडकणार आहे. ती दिल्लीचा बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न करतेय. सोनमचे वडील लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. याच काळात दिल्लीतील मैडम तुसाद म्यूझिअममध्येही तयारी करण्यात आली आहे. म्यूझिअममध्ये ठेवलेल्या अनिल कपूर यांच्या स्टॅच्यूचा मेकओव्हर करण्यात आलाय. म्यूझिअमकडून सोनमच्या लग्नात हे गिफ्ट दिले गेले. 


ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे अनिल कपूर
- मैडम तुसा म्यूझिअमने अनिल कपूरच्या वॅक्स स्टॅच्यूचे मेकओव्हर केले आहे.
- यामध्ये ते पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत.
- अनिलला फेटा आणि माळ घालण्यात आली आहे.
- अनिलसमोर दोन ढोल वाजवणारे आहेत.
- म्यूझिअम मॅनेजमेंटने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
- या फोटोला 'Its celebration time at #TussaudsDelhi. @anilskapoor kapoor is dressed up in a traditional attire for his daughter @sonamkapoor’s big fat punjabi wedding with @anandahuja. Come and see him in this Jhakkas avatar'. असे कॅप्शन देण्यात आले आहे. 
- अनिल कपूरच्या घरी सोनम कपूरच्या लग्नाची तयारी सुरु आहे. बॉलिवूड सेलेब्स संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म्स करणार आहे. याची रिहर्सल करण्यासाठी ते सोनमच्या घरी पोहोचत आहेत. सोनमच्या लग्नाचे कार्यक्रम तीन ठिकाणी होणार आहेत. 7 मेला सोनम आणि आऩंदची मेहेंदी सेरेमनी होईल. सेरेमनी सध्याकाळी 4 वाजता बिकेसी येथील सनटेकम सिग्नेचर आयलँडमध्ये होईल. वेडिंग सेरेमनी 8 मेला सकाळी 11 ते 12.30 या काळात रॉकडे,256, बँडस्टँड बांद्रामध्ये होईल.

बातम्या आणखी आहेत...