आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Madame Tussaud म्यूझियममध्ये लागणार अनुष्का शर्माचा टॉकिंग स्टॅच्यू, स्पर्श होताच बोलायला लागेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हॅक्स स्टॅच्यू लवकरच तयार होणार आहे. सिंगापुरच्या मादाम तुसाद म्यूझियममध्ये हा स्टॅच्यू तयार होणार आहे. हा स्टॅच्यू बॉलिवूडच्या इतर सेलेब्सच्या स्टॅच्यूपेक्षा पुर्णपणे वेगळा असेल. यामध्ये स्पेशल इंटरेक्टिव्ह फीचर असेल, यांच्यामदतीने तो आपल्याशी बोलू शकेल.


सेल्फीसाठी हातात असेल फोन
असे मानले जात आहे की, अनुष्काचा स्टॅच्यू लोकांशी बोलेल. एखाद्या व्यक्तीचा स्टॅच्यूला स्पर्श होताच स्टॅच्यू बोलायला लागेल. स्टॅच्यूच्या हातात फोन असेल यांच्या मदतीने सेल्फीही घेता येईल.

 

असा स्टॅच्यू असणारी अनुष्का पहिली बॉलिवूड सेलेब 
मादाम तुसाद व्हॅक्स  म्यूझियममध्ये खुप कमी लोकांच्या स्टॅच्यूवर स्पेशल इंटरेक्टिव्ह फीचरचा प्रयोग करण्यात आला आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, ओपरा विनफ्रे आणि लुईस हॅमिल्टनसारख्या इंटरनॅशनल आयकॉननंतर आता अनुष्काचा टॉकिंग स्टॅच्यू लावण्यात येईल. असा स्टॅच्यू असणारी ती बॉलिवूडची पहिली सेलेब असेल.


'संजू'च्या यशाने आनंदी
राजकुमार हिरानीच्या 'संजू' चित्रपटात अनुष्का शर्माने सपोर्टिंग रोल प्ले केला आहे. या चित्रपटात बॉक्स ऑफिसवर 12 दिवसात 280 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपट संजय दत्तच्या बायोपिकवर आधारित आहे. 'झिरो' हा अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट आहे. चित्रपटात ती शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यासोबतच वरुण धवनसोबत ती 'सुई धागा' चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच तिचे नाव फोर्ब्सच्या '30 अंडर 30 एशिया 2018' लिस्टमध्ये आले होते.

बातम्या आणखी आहेत...